भोपाळ/मध्यप्रदेशातील पचमढीत सुरू असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधींना दोन मिनिटांचा उशीर महागात पडला. शिबिरातील अनुशासन मोडल्यामुळे काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना काढण्याची शिक्षा देण्यात आली. काँग्रेसने सर्वांसाठी समान नियम असल्याचा दावा केला असला तरी, या घटनेने पुन्हा एकदा राहुल गांधींची शिस्त अधोरेखीत झाली आहे.काँग्रेसचे मीडिया समन्वयक अभिनव बरोलिया यांनी सांगितले की, शिबिरात कडक अनुशासन पाळले जाते आणि कोणालाही विशेष वागणूक दिली जात नाही. राहुलजींसाठी हे काही नवीन नाही. आमच्या पक्षात सर्व समान आहेत. भाजप सारखी ‘बॉसगिरी’ येथे नाही.पक्ष सूत्रांच्या माहितीनुसार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांनी ‘संगठन सृजन अभियान’अंतर्गत शिबिरात उशीर करणाऱ्यांसाठी १० पुशअप ही शिक्षा निश्चित केली होती. २०२८ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे आणि तो 11 नोव्हेंबरला संपणार आहे.राहुल गांधी त्याच दिवशी बिहार निवडणूक प्रचारासाठी रवाना झाले. गेल्या पाच महिन्यांत मध्यप्रदेशचा हा त्यांचा दुसरा दौरा होता. राहुल गांधींनी जूनमध्येच ‘संगठन सृजन अभियान’ला सुरुवात केली होती. दरम्यान या घटनेनंतर आता काँग्रेस मधेही अनुशासन राबवले जात असल्याचे दिसून येत आहे.

