मुंबई/मत चोरी आणि मतदार यादी मधील घोळ याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोपांच्या फेरी झालेल्या असतानाच, आता मुंबईतील काँग्रेसचे आमदार असलम शेख यांचेही दोन मतदार याद्यांमध्ये नाव असल्याचे उघडकीस आले आहे. आता आमदारांचे दोन मतदार यादी मध्ये नाव आल्याने मोठी खळबळ माजली आहे. अस्लम शेख शेख यांनी मात्र या प्रकरणी आपला काही दोष नसून याला निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचे म्हटले आहे
मतदार याद्यांमध्ये घोळ आणि मागील निवडणुकांमध्ये झालेले दुबार तीबार मतदान या विरुद्ध विरोधी पक्षांनी देशात रान उठवले होते.ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडी या प्रकरणी निवडणूक आयोगाविरुद्ध महामोर्चा काढून पुरावे सादर केले होते.त्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनीही भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन काही मुस्लिम मतदारांची नावेही दोन दोन ठिकाणच्या मतदार याद्यांमध्रसल्याचे आणि त्याबाबत ठाकरे बंधू काही बोलत नसल्याचा आरोप केला होता..आता मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचेही दोन मतदार याद्यांमध्ये नाव असल्याचे सांगून या मतदार याद्यांचे फोटोही शेअर केले आहेत.तसेच या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.अस्लम शेख यांनी मात्र याबाबत निवडणूक आयोगाला जबाबदार धरले आहे.

