मुंबई/मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आज राज ठाकरे यांनी सर्वांचीच हजेरी घेतली राज्यपाल कोशारि, उद्धव ठाकरे, राहुल गांधी सर्वांवर टीका केली आणि पालिका निवडणुकीसाठी पूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरा मी तुम्हाला महापालिकेची सत्ता देतो असे कार्यकर्त्यांना सांगितले तर सावरकरांवर बोलण्याची राहुल गांधींची लायकी आहे का ? राहुल गांधी हा गुळगुळीत मेंदूचा माणूस आहे असे सांगितले तर राज्यपाल बद्दल बोलताना या माणसाच्या पदाचा आणि वयाचा विचार करतो अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही असे सांगितले . उद्वव ठाकरे हे सतेसाठी कोणाचाही हातात हात घेतील . शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आता फिरत आहेत अशा शब्दात उद्धव वर टीका केली तसेच अजूनही काही मशिदींवरील भोगे मोठ्या आवाजात वाजत आहे तेंव्हा अगोदर पोलिसांकडे तक्रार करा आणि कारवाई झाली नाही तर जिथे हे भोंगे वाजतील तिथे ट्रक लावा आणि दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले .
Similar Posts
चाव्या कोणाकडेही असुदेत तिजोरीचे मालक आपणच! चंद्रकांत पाटलांचा अजितदादांवर हल्लाबोल महायुतीत तणाव
पुणे/राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे असं वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकात पाटील यांनी केलं. तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असंही ते म्हणाले. गडहिंग्लजमधील प्रचारसभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत, कुणाला निधी द्यायचा आणि कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य नुकतंच राष्ट्रवादीचे…
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अपूर्ण 16 बंडखोर आमदारांचा -आज फैसला
दिल्ली/महाराष्ट्रात सत्ता संघर्षा वरून सुरू असलेली न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून 16 बंडखोर आमदारांच्या अपात्र तेवर दोन्ही कडून युक्तीवाद सुरू आहे मात्र तो काल अपूर्ण राहिल्याने त्यावर आज सुनावणी होऊन फैसला होणार आहे त्यामुळे आजचा दिवस शिवसेना आणि शिंदे गटासाठी खूपच महत्वाचा आहेशिवसेनेतून बंडखोरी केलेल्या 16 आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगरल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे…
भिवंडीत एक मजली इमारत कोसळली , एकाचा मृत्यू तर सात जण जखमी…
भिवंडी (आकाश गायकवाड ) शहरातील आजमी नगर येथील टिपू सुलतान चौक परिसरात असलेली एक मजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या दुर्घटनेत एक जणाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत. रजाक ( वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष ) असे दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर हसीम शेख ३५, सुबेदा…
राज ठाकरे- आशिष शेलार भेट
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सांगत झाल्यानंतर विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे, निवडणुकांमधील आरोप-प्रत्यारोप, राजी-नाराजीपासून काही वेळासाठी दूर झालेली राजकीय मंडळी पुन्हा विधानपरिषद निवडणुकांसाठी सज्ज झाली. त्यामुळे, पुन्हा एकदा महायुती व महाविकास आघाडीतील शीतयुद्ध समोर आल्याचं दिसून आलं. त्यातच, भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला. मनसेनं अभिजीत…
रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत खुले करा-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांचे निर्देश
मुंबई, दि. 3 जानेवारी 2025 पु. ल. देशपांडे अकादमीच्या नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन नाट्य, सिनेमा कलावंत आणि प्रेक्षकांना रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेर पर्यंत खुले करु देता येईल या दृष्टीने कामाचे नियोजन करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज अधिका-यांना दिले. महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे अकादमीच्या नुतनीकरणाचे काम…
किशोरी पेडणेकर यांच्यावर – एस आर ए घोटाळ्याचा आरोप
मुंबई/ संजय राऊत यांच्या नंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पेडणेकर यांनी वरळीतील गोमाता एस आर ए प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे . या प्रकरणी दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशी केल्याचे समजते तर स्वतः पेडणेकर यांनी काही पत्रकारांना घेऊन गोमाता प्रकल्पातील इमारतीला भेट दिली जर या…
