मुंबई/दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत नवनवीन खुलासे व्हायला सुरुवात झाली आहे. दिल्ली स्फोटाचे कनेक्शन हे फरिदाबाद मॉड्यूलसोबत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी फरीदाबादमधून डॉक्टर जम्मिल शकील आणि लखनऊमधून डॉक्टर महिला शाहीन शाहिद हिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. आता महिला डॉक्टर शाहीन शाहिदचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. डॉ.शाहीन शाहिद जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेच्या जमात उल मोमिनतची कमांडर होती. दशहतवादी मसूद अझहरची बहीण सादिया अजहर ही या संघटनेची पाकिस्तानमधील प्रमुख आहे. याचाच अर्थ डॉक्टर शाहीन ही थेट जैश-ए-मोहम्मदच्या दहशतावाद्यांशी जोडलेली होती. शाहिन शाहिदीच्या आलिशान कारमधून AK-47 रायफल आणि अनेक मॅगझिन जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा झाला आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, काही काळ मेडिकल कॉलेजमध्ये काम केल्यानंतर, शाहीनने २०१३ साली महाराष्ट्रातील जफर हयातशी लग्न केले होते. मात्र २०१५ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता. घटस्फोटापूर्वी काही काळ ती महाराष्ट्रात वास्तव्यास होती अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पोलीसांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच शाहिन महाराष्ट्रात नेमकी कुणाच्या संपर्कात होती याची चौकशी सुरू करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.स्पेशल टास्क फोर्सने (एस्टीफ) 30 ऑक्टोबर रोजी फरिदाबादच्या धौज परिसरातून अल-फलाह विद्यापीठातील एमबीबीएसचा विद्यार्थी डॉ. मुझमिल अहमद याला अटक केली होती. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान मुझमिलने शाहिन शाहिदचे नाव घेतले. जेव्हा तिच्या आलिशान कारमध्ये AK-47 रायफल आणि अनेक मॅगझिन सापडल्या तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. कारण कारची नंबर प्लेट डॉ. शाहिना यांच्या नावावर होती. शाहिना एका प्रतिष्ठित रुग्णालयात प्रॅक्टिस करत होती, ज्यामुळे तिच्यावर कोणालाही संशय आला नाही. आता एजन्सीकडून तिची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

