[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

केंद्राच्या अध्यादेश विरूद्ध आम् आदमी पक्षाची आरपारची लढाई

दिल्ली/ तब्बल 12 वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी ज्या दिल्लीच्या रामलीला मैदान वरून भ्रष्टाचार विरूद्ध आंदोलन छेडले होते त्याच रामलीला मैदानावरून आज आम् आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारच्या अन्यायकारक अध्यादेशाच्या विरूद्ध आरपारची लढाई सुरू केली आहे केंद्राच्या अध्यादेशाला संसदेत विरोध करण्यासाठी केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षाचा नेत्यांची भेट घेतली तसेच आज दिल्लीत एक भव्य रॅली काढली या रॅलीत बोलताना त्यांनी मोदींवर कठोर शब्दात टीका केली ते म्हणाले चौथी पास राजाला देश कसा चालवायचा हे कसे कळणार आहे.आणि लोकांना शिक्षण,रोजगार,मोफत वीज पाणी दिले आणि हे बघवत नसल्याने आमच्या नेत्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवून तुरुंगात डांबले जात आहे पण 100 शिसोदिया ना तुरुंगात घाला,100 सत्यंदर जैन यांच्यावर अटकेची कारवाई करा पण तितकेच पुन्हा तयार होतील आणि तुम्हाला धडा शिकवत अन्यचा मुकाबला करतील असे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!