मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही अपेक्षेशिवाय घरच खाऊन खिशातले पैसे खर्च करून आणि स्वतचा वेळ देऊन समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करीत असतो म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील सर्वात मोठी आणि चांगली युनिव्हार्सिटी आहे .म्हणूनच संघाला राजकीय वादात ओढू नका अशा शब्दात बाबूभाई भवानजी यांनी जावेद अखतर यांना बजावले आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डों.केशव बळीराम हेग्डेवार यांचे आणि संघाचे निस्वार्थ हिंदू हिताचे कार्य पाहून नागपुरचे राजे भोसले यांनी हेडगेवर यांना एक मोठा भूखंड दान देऊ केला होता . पण त्यांनी तो विंनम्रपणे नाकारून सांगितले की मला या कार्यासाठी काहीही विनामुल्य नको ही भूमी मी योगी तो मोबदला देऊन विकत घेईन जेणे करून भविष्यात कुणी म्हणता नये की संघाने फुकट काही घेतले. त्यानंतर हेड्गेवार यांनी स्वयमसेवकांकडून जमा असलेल्या पैशातून रेशीमबाग येथील भूखंड नोंदणी करून अधिकृतरीत्या विकत घेतला आणि त्यातील सर्व वस्तु स्वयमसेवकणी दरवर्षी अर्पण केलेल्या निधीतून बांधल्या अर्थात संपूर्ण भारतभर दुसर्यांच्या जमिनी हडप करणार्यांना हे कसे ठाऊक असेल भारतरत्न पंडित मदन मोहन मालविय यांनी डॉक्टरांना संगितले की तुम्हाला सर्व कार्यासाठी लागणारा निधि मी दान मागून आणून देतो . पण डों. हेडगेवर यांनी त्याला नकार दिला व संगितले की माझे स्वयंसेवक त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नातून त्यांना मिळणार्या धंनाच्या समर्पणातून आवश्यक तो निधि जमवतील हा संदेश त्यांनी दिला . आज तीच परंपरा संघ चालवतोय पण दुसर्याचा पैसा अनेक मार्गानी लुटणार्याना हे कळणार नाही असे बाबूभाई पुढे म्हणाले की संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी तर सरसंघ चालकच्या अत्यविधी अथवा समाधीसाठी वेगळी भूमी नको तर इतर सर्वसामान्य लोका प्रमानेच स्मशाभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावेत आणि त्याची सुरुवात स्वता पासून केली पुढे तोच पायंडा रज्जु भय्या आणि सुदर्शन यांनी चालू ठेवला पण हे तुमच्या पचणी पडणार नाही कारण मेल्यावर समाधी आणि अंत्यविधीच्या नावाखाली शेकडो ऐकर जमीन लाटण्याची तुमची परंपरा आहे अशा शब्दात बाबूभाईनी सुनावले पुढे म्हणाले की संघाचे जावू द्या त्यांच्या इतका त्याग करायची तुमची कुवत नाही त्यामुळे निदान भाजपशी तरी बरोबरी करू नका .वाजपेयी 6 वर्ष पंतप्रधान होते मात्र त्यांचे निधन होताच त्यांच्या दत्तक मुलीने तत्काल सरकारी बंगला खाली केला . सुषमा स्वराज अरुण जेटली यांनी मंत्रिपद तसेच खासदारकी गेल्यावर सरकारी बंगले ताबडतोब खाली केले . अनंत कुमार मंत्री असताना स्वर्गवासी झाले पण त्यांच्या पत्नीने ताबडतोब बंगला खाली केला . फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहूनही मुंबईत घर घेऊ शकले नाहीत , अनेक नेते तीन तीन पिढ्या सरकारी बंगल्यावर कब्जा करून बसलेत तुमच्या मित्रपक्षाच्या एका नेत्याने तर बंगला खाली करताना नळ तोटया वातानुकूलित पत्रे सुधा काढून नेले म्हणूनच अख्तर साहेब निस्वार्थी होणे सेवा करणार्या संघाला राजकरणात ओढू नका असे भवानजी यांनी म्हटले आहे
Similar Posts
जनगणना ‘लांबवणे’ अर्थव्यवस्थेला हानिकारक !
आपली दशवार्षिक जनगणना करोनाच्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आली. त्याला आता तीन वर्षे होऊन गेली. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन गेल्या. जनगणना प्रत्यक्षात कधी होईल याचा काहीच अंदाज नाही. काही हालचाल नाही. जनगणना लांबणे अर्थव्यवस्थेसाठी खूप हानिकारक आहे. देशाचे आर्थिक नियोजन, विविध सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. जनगणना लांबवणे राजकीयदृष्टया शहाणपणाचे नाही. या…
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचेसर्व उमेदवार विजयी ! काँग्रेसची मते फुटल्याने शेकापचे जयंत पाटील पराभूत !
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचेसर्व उमेदवार विजयी ! काँग्रेसची मते फुटल्यानेशेकापचे जयंत पाटील पराभूत ! मिलिंद नार्वेकर मात्र विजयीमुंबई – विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झलेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसची ८ मते फुटल्याने शरद पवारांनी पाठींबा दिलेले शेकापचे जयंत पाटील पडले. मात्र ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. भाजपाकडे ११० मते…
शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांचे योगिना खुले आव्हान
लखनौ/प्रयागराज माघ मेळा सोडल्यानंतर, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी योगी सरकारवर तीव्र हल्लाबोल केला. त्यांनी वाराणसीत पत्रकार परिषद घेतली आणि म्हटले की, “मला माझ्या शंकराचार्य दर्जाचे प्रमाणपत्र मागितले गेले होते. मी ते दिले. माझे पुरावे खरे होते, म्हणून त्यांना ते स्वीकारावे लागले. आता पुरावे मागण्याची वेळ संपली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हिंदू ओळखीचा पुरावा द्यावा.” ते म्हणाले, “आम्ही…
राहुल गांधींचे पुन्हा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप – आयोगाने आरोप फेटाळले
नवी दिल्ली/ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपावर निवडणूक आयोगाच्या मदतीने मत चोरीचा आरोप केला आहे.यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राजुरा मतदार संघात ६८५० नवीन नवे घुसवण्यात आली तर कर्नाटकातील आळंद मतदार संघात ६०१८ नावे बेकायदेशीरपणे वगळण्यात आल्याचा आरोप केला .त्यासाठी पुरावा म्हणून एका मतदारालाच पत्रकार परिषदेत हजर केले.त्यामुळे निवडणूक आयोगावरचा संशय वाढला…
शिवसेनेच्या पत्राची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल
दिल्ली/ नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची जी भाषा केली होती त्यामुळे त्यांना तात्काळ केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी शिवसेनेने एका पत्राद्वारे लेखी स्वरूपात केली होती त्याची अवघ्या दहा मिनिटात पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून पंतप्रधान व्यस्त असल्याने आपण या प्रकरणी अमित शहा यांच्याशी बोला असे शिवसेना नेत्यांना कळवले आहे
ओलिंपिया कॉफी हाऊस व नायर हॉस्पिटल कँटीनवर एफडीएची मोठी कारवाई; अन्न परवाने निलंबित
| मुंबईअन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) आपला बडगा उगारला आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा भागातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध ओलिंपिया कॉफी हाऊस तसेच मुंबई सेंट्रल येथील महापालिकेच्या बी. वाय. एल. नायर रुग्णालयातील उपहारगृहावर (कँटीन) एफडीएने धडक कारवाई करत त्यांचे अन्न परवाने (Food Licence) तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत.‘सेफ फूड सेफ…
