गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा प्रताप! कुख्यात गुंड निलेश धायवळच्या भावाला शस्त्र परवाना
पुणे/ कांदिवलीतील बारमुळे अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले रामदास कदम यांचे चिरंजीव आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. कदम यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांचा आदेश डावलून पुण्यातील कुख्यात गुंड निलेश धायवळ याच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याचे उघडकीस आले आहे.आता या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून योगेश कदम यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली…
