मुंबई / स्थानिक मराठी जनतेचा विरोध डावलून महानगरपालिकेने अखेर कबुतरखान्यांबाबत मोठा निर्णय घेत चार ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी दिली आहे.मात्र पालिकेच्या या निर्णयाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद असलेल्या कबुतरखान्यांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने चार नवीन ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकण्यास परवानगी दिली आहे. या ठिकाणी फक्त सकाळी ७ ते ९ या वेळेतच कबुतरांना दाणे देता येतील.
स्वयंसेवी संस्थांना जबाबदारी स्वीकारुन या कबुतरखान्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. तसेच तज्ज्ञ समिती अहवाल आणि न्यायालयाचे आदेश प्राप्त होईपर्यंत ही अंतरिम व्यवस्था राहणार असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत सध्या बंद करण्यात आलेले कबुतरखाने सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही, ते बंदच राहणार असंही महापालिकेने स्पष्ट केलं आहे.
वरळी जलाशय,लोखंडवाला खारफुटी परिसर,एरोली मुलुंड जकात नाका आणि बोरिवली गोराई मैदान या चार ठिकाणी कबुतरांना डेन टाकण्यास पालिकेने परवानगी दिली आहे पण त्यालाही स्थानिकांनी विरोध केला असून तशी पत्र पालिकेला दिली आहे.मात्र पालिकेने जबरदस्ती केल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

