मत चोरीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करा! मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंच्या आदेश
मुंबई/आगामी पालिका निवडणुकीसाठी रणनीती आखताना मतचोरीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी देऊन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भूमिकेचे समर्थन केले.सावित्रीबाई फुले स्मारक येथे मंगळवारी मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या वेळी नेते अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, सरचिटणीस हेमंत संभूस, रणजित शिरोळे, अजय…
