पुणे/मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना जमीन व्यवहार प्रकरणात अभय दिलं, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. देवेंद्र फडणवीस त्यांनी भूमिका मांडली. “ज्यांना एफआयआर काय असतो हे समजत नाही असेच लोकं या प्रकारचा आरोप करु शकतात. एफआयआर दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस पार्टी असतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात कंपनीच्या सिग्नेटरीवर एफआयआर दाखल होतो. ज्यांनी सही केली, ज्यांनी विक्री केली ते, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं ते, ज्यांनी फेरफार केला ते अशा सर्वांवर हा एफआरआय दाखल झाला आहे. चौकशी दरम्यान अजून कुणाची नावे आली तर त्यांच्यावर ही कारवाई होत असते. आता कारवाई केल त्यामध्ये कुणालाही डावलेलं नाही. नियमानुसार, सही केलेले, पावर ऑफ अटर्नी हे एफआयआरचे जबाबदार असतात त्यांना जबाबदार धरलेलं आहे”,अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.माझ्या माहितीनुसार, हा जो करार त्यांनी केला होता, त्या करारमध्ये पैशांचा व्यवहार बाकी होता. पण रजिस्ट्रेशन झालं होतं. त्यांनी दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी, असा अर्ज केलेला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना पैसे भरावे लागतात. त्या संदर्भातील नोटीस जारी झाली आहे. त्यामुळे पुढची कारवाई जी आहे ती होईल. पण हे जरी झालं तरीदेखील जी क्रिमिनल केस दाखल झाली आहे ती संपणार नाही. या प्रकरणात जी अनियमितता आहे, त्याला जो कुणी जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई होईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाल

