देशाची स्थिती भले कितीही वाईट असो पण पंतप्रधान मोदी मात्र स्वतःची प्रतिमा जागतिक पातळीवर जास्तीत जास्त कशी चांगली होईल तयासाठी धडपडत आहेत. त्यांच्या अमेरिका दौऱ्यात जे चित्र बघायला मिळाले. त्याने भाजपावाल्यांना भलेही आनंद झालेला असला परंतु भारतीय जनतेसाठी मात्र ते चित्र समाधानकारक नव्हते. जगात भारताची प्रतिमा चांगली असायला हवी याबद्दल वादच नाही आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण त्या अगोदर देशातली स्थिती सुधारायला हवी देशातलं वातावरण शांततेच आणि सौहारदाच असायला हवं. पण आज तरी देशात तसं वातावरण नाही. आणि म्हणूनच पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्या विषयी लोकांच्या मनात काही फारशी चांगली भावना नाही. अगोदर आपल्या घरातलं बघा आणि नंतर बाहेरच्या जगाकडे लक्ष द्या असं लोकांना वाटते. त्यात काहीही चुकीचे नाही. एकीकडे मोदींचे परदेश दौरे सुरू असतानाच इकडे भारतात 2024 च्या निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी 17 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. शुक्रवारी बिहारची राजधानी पाटणा येथे सर्व विरोधी पक्ष नेत्यांची एक मोठी बैठक झाली या बैठकीला नितीश कुमार पासून शरद पवारांपर्यंत आणि ममता पासून उद्धव ठाकरे पर्यंत अनेक नेते उपस्थित होते. मोदींच्या विरोधात विरोधी पक्षाची ही एकजूट निश्चितपणे समाधानकारक असली तरी हे विरोधी नेते किती दिवस एकत्र राहतील याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. तसे पाहता विरोधी पक्षाच्या ऐक्याचा हा काही पहिला प्रयोग नाही. यापूर्वीही असे प्रयोग झालेले आहेत अगदी जनता पार्टीच्या काळापासून आतापर्यंत अनेक वेळा विरोधक एकत्र आले केंद्रात त्यांनी सत्ताही स्थापन केली पण त्यांचे ऐक्य फार काळ टिकू शकले नाही कारण विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याची एक महत्वकांक्षा आहे आणि याच महत्त्वकांक्षामुळे नेतृत्वाचा प्रश्न प्रत्येक वेळी उभा राहतो आणि त्यामुळेच ऐक्य मोडते त्यामुळे लोकांचा विरोधी पक्षाच्या ऐक्यावर अजिबात विश्वास नाही. आताही जे 17 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत त्यातील बहुतेक नेते हे फुटीर आहेत स्वतः नितीश कुमार यांनी अनेक वेळा पक्षांतर केलेले आहे. तर शरद पवार आणि ममता बॅनर्जी काँग्रेस मधले फुटीर आहेत केजरीवाल यांनी तर अण्णांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता केवळ नाममात्र राहिलेली आहे हेमंत सोरेन यांच्या पक्षाला झारखंड बाहेर कोणी ओळखत नाही. मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांची ही जवळपास अशीच स्थिती आहे. राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा तर भारतात अजूनही काही लोकांच्या मनात काँग्रेस विषयी आपुलकी आहे आणि त्यातूनच भारतातील पाच राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे पण आज सर्व राज्यांमध्ये काँग्रेसची पक्ष संघटना खिळखीळ झालेली आहे त्यामुळे आम्ही एकट्याने मोदींना टक्कर देऊ शकत नाही हे काँग्रेसने यापूर्वीच कबूल केलेले आहे अशा परिस्थितीत बुडत्याला काडीचा आधार या म्हणीनुसार काँग्रेस विरोधी पक्षांच्या गोतावळ्यात सामील झालेली आहे. काँग्रेसचे ममता बॅनर्जी अखिलेश यादव आणि केजरीवाल यांच्याशी अजिबात पटत नाही त्यामुळे काँग्रेस या सर्वांसोबत एकत्र राहील का हाच खरा प्रश्न आहे.
Similar Posts
अरेच्च्या ! लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्यासाठी – १२ लबाड भावानी भरले अर्ज
छत्रपती संभाजी नगर – सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु झाले आहेत.छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड जिल्ह्यात चक्क १२ जणांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले त्यावर महिलांचा फोटो लावला पण इतर कागदपत्र स्वतःच्या नावाची असल्याने ते पक्स्डले गेले . त्यामुळे या लबाड भावांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेमुख्यमंत्री माझी लाडकी…
आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर
ठाणे/ भाजपतील महिलेने केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहेकळवा येथील मुख्यमंत्र्यांच्या एक कार्यक्रमात गर्दीतून वाट काढताना जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला ढकलले होते त्यामुळे त्यांच्यावर कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता .त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते . दरम्यान या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता असल्याने…
शिंदेंच्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर
मुंबई/ अनधिकृत बांधकामांच्या कडे नेहमीच कानाडोळा करणाऱ्या मुंबई महापालिकेने यावेळी मात्र इतकी सतर्कता दाखवली की चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना शाखेवर बुलडोझर फिरवून सरकारलाच मोठा धक्का दिलाशिवसेना फुटून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर शिंदेंच्या सरदारांनी सुरवातीला शिवसेनेच्या शाखा बळकावण्याचा प्रयत्न केला पण शिवसैनिकांनी त्याला कडवा विरोध करताच शिंदेंच्या सेनेने आपल्या पक्षाच्या शाखा बांधायला सुरुवात केली चेंबूर…
शिंदे सरकारला मोठा दणका आघाडी सरकारच्या कामांना स्थगिती देण्याच्या निर्णयालाच स्थगिती
मुंबई – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वाटेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या काळात घेण्यात आलेल्या विकासकामांच्या निर्णयांना स्थगिती दिली होती . मात्र त्यांच्या त्या निर्णयाला मुंबई उच्चं न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिदें सरकारला हा मोठा धका आहे .न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि वर्कऑर्डर झालेल्या कामांना स्थगिती देण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या…
मराठा आरक्षणासाठी पुन्हा जरांगेचे उपोषण -मुख्यमंत्री – उप मुख्यमंत्री तातडीने दिल्लीला
मुंबई- मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात आश्वासन दिले होते पण त्यानंतरही मराठा नेते मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा समाज आता आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसत आहे. मनोज जरांगे उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. त्यांना आज सकाळी मंत्री गिरीश महाजन यांनी फोन करुन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम…
स्वागत नवं वर्षाचे आव्हान परतलेल्या कोरोनाचे
सरत्या वर्षाचा कटू गोड आठवणींना मागे टाकून 2023 या नव वर्षात पदार्पण करताना माणसाने निश्चितपणे स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी काहीतरी संकल्प केले असतील . पण या वर्षात त्याची पूर्तता होईल की नाही याची मात्र काहीच शास्वती दिसत नाही. आणि त्याची कारणेही तशीच आहेत.माणसाचे जीवन दिवसेंदिवस खडतर आणि तितकेच आव्हानात्मक बनत चालले आहे. महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार आणि या सर्वांना…
