महाराष्ट्र एफडीएची मोठी कारवाई: रासायनिक केळी, भेसळयुक्त दूध व गुटखा जप्त; आठ खाद्यगृहांचे परवाने निलंबित
मुंबई:महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. याअंतर्गत प्रशासनाने विविध कारवाया करत आठ खाद्यगृहांचे परवाने व तिघांची नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित केली आहेत. मुंबईसह विविध भागांत केलेल्या या धडक कारवाईत १,३९४ किलो रासायनिक पद्धतीने (इथिफॉनच्या साहाय्याने) पिकवलेली केळी, प्रतिबंधित गुटखा आणि १६,७३० लिटर डिटर्जंट भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले…
