कबड्डी दिनी आठवणींचा जल्लोष, सन्मानांचा वर्षावपाटील, खटावकर यांना जीवनगौरव; मंगेश वरवडेकर यांचाही गौरव
रत्नागिरी, : कबड्डी महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त साजर्या करण्यात आलेल्या २६ व्या कबड्डी दिनाने रत्नागिरीत कबड्डीचा खर्या अर्थाने कौटुंबिक मेळावा रंगवला. राज्याच्या कानाकोपर्यातून आलेले शेकडो माजी-विद्यमान खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, कार्यकर्ते आणि कबड्डीप्रेमींनी देसाई बँक्वेट हॉल गजबजून गेले. अनेक वर्षांनी एकमेकांना भेटलेल्या कबड्डीच्या वारकर्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने हा सोहळा संस्मरणीय आणि…
