मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र व कोकणात अतिवृष्टी-नद्यांना महापूर चौघे वाहून गेले महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे थैमान
मुंबई/ काही दिवस विश्रांती घेऊन परतलेल्या पावसाने काल मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र,कोकण आणि मुंबईलाही झोडपून काडले उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नद्यांना महापूर आल्याने या पुरात एका वृध्द महिलेसह चार जन वाहून गेले तसेच गुरेढोरे वाहून गेली शेतात पाणी शिरल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला…
