अमिताभचे यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत आहे. तरीही टीव्हीवर, सिनेमात, जाहिरातीत, इव्हेंट्समध्ये, सरकारी उपक्रमात, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर असा तो सर्वसंचारी आहे. अगदी तरुणपणी त्याला हवाईदलात जायची इच्छा होती. सात हिंदुस्तानी, आनंद, प्यार की कहानी, रास्ते का पत्थर, बंधे हाथ, एक नजर, बन्सी बिरजूमधला अमिताभ नवखा, पण उत्कट होता. तो स्टाइलाइज्ड झाला नव्हता. ‘भुवन शोम’ या देशातील पहिल्या समांतर सिनेमास त्याने आपला आवाज दिला. पण स्वत: मात्र समांतर सिनेमाकडे पाठ फिरवली. मात्र त्याची अभिरुची उच्च दर्जाची आहे. दिलीपकुमार व वहिदा हे त्याचे आवडते कलावंत आहेत. तो उत्तम सतार वाजवतो आणि प्रभावीपणे कविता सादर करतो. देव आनंद वा राजेश खन्नाप्रमाणे तो फक्त स्वप्रेमातच बुडालेला नाही. इतरांच्या अभिनयास फुले व चिठ्ठी पाठवून तो दादही देतो. त्याने सर्वाधिक दुहेरी-तिहेरी भूमिका केल्या आहेत. आजही तो रेलेव्हंट वाटतो. माझ्या, म्हणजे बाबू मोशायच्या ‘शहेनशहा अमिताभ’ या पुस्तकामध्ये त्याच्याबद्दलचे वेगळे विश्लेषण वाचायला मिळेल. अमिताभला शुभेच्छा!- हेमंत देसाई
Similar Posts
वस्रहरण नव्या संचात रंगभूमीवर – लेखक गवाणकर सरपंचाच्या भूमिकेत
प्रतिनिधी /मुंबई – नाटक संगीत वस्त्रहरणसातासमुद्रापार नावलौकिक झालेले, विश्वविक्रमी, तसेच अस्सल मालवणी भाषेतून साकारलेले एकमेव धमाल विनोदी नाटक संगीत वस्त्रहरण ज्यांच्या लेखणीतून आजरामर झालेले असे आदरणीय माडबनगावचे सुपुत्र * गंगाराम गवाणकर (नाना)* यांनी स्थानिक माडबन गावचे युवा कलाकार घेऊन नव्या उमेदीने पुन्हा रंगभूमीवर स्वतः तात्या सरपंच यांची भूमिका वयाच्या पंच्याअंशीव्या वर्षी सुध्दा तारुण्याला लाजवेल अशी…
महेश मांजरेकर यांचा गोडसे चित्रपट राष्ट्रवादी प्रदर्शित होऊ देणार नाही
मुंबई/ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी नथुराम गोडसे यांच्या जीवनावर महेश मांजरेकर चित्रपट तयार करणार असून त्याचा ट्रीझर गांधी जयंती दिवशी दाखवण्यात आला मात्र राष्ट्रवादीने गोडसे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला असून महेश मांजरेकर हे हीन पातळीला गेलेत हेच त्यांच्या या कृतीवरून दिसत आहेत असे म्हटले आहे .त्याच बरोबर गोडसेला विरोध…
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना; नव्याने १५ सदस्यांची नियुक्ती
मुंबई, दि. १४- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून नव्याने १५ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. रंगमंचावर सादर होणाऱ्या प्रयोगाच्या संहितांचे पूर्व परिक्षण करण्यासाठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची स्थापना झालेली आहे. रंगमंचावरील प्रयोगाच्या संहिताचे पूर्वपरिक्षण करुन सार्वजनिक करमणूकीच्या जागी…
दादासाहेब फाळके यांना आदरांजली
दादर -भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्त आज दादर मध्ये दादासाहेब फाळके चौक येथे त्यांना आदरांजली व्हाहण्यात आली .।या प्रसंगी अखिल भारतीय चित्रपट सेना आणि शिवसेना चित्रपट सेनेचे अनेक अभिनेते आणि पदाधिकारी उपस्थित होते .अभिनेता सुशांत शेलार। चित्रपट सेनेचे संग्राम शिर्के।दिलीप दळवी ।गिरीश विचारे।स्नेहा साटम।योगिता धुवाली।सुरेश सालीयन।निहाल खान।विजय होडगे।किशोर उमबरकर। आणि प्रशांत…
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपले अष्टपैलू अभिनय आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व लेखक नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘नटसम्राट’ आणि ‘वेलकम’ यांसारख्या अजरामर चित्रपटांमधील त्यांच्या सशक्त अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीवर आणि रंगभूमीवर एक वेगळाच ठसा उमटवला….
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईअमोल कोल्हे विरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट
नथुराम वरून राष्ट्रवादीत मतभेदमुंबई/ व्हाय कील आय गांधी? या चित्रपटात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका करून त्या भूमिकेतील नथुराम याच्या माध्यमातून गांधी हत्येचे समर्थन केल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.अमोल कोल्हे याला राष्ट्रवादीतून हाकला अशी मागणी केली जात आहे तर दुसरीकडे नथुराम वरून राष्ट्रवादी मध्येच दोन मत प्रवाह निर्माण झाले आहे.नथुराम…
