मीरारोड – मीरारोड मध्ये राहणाऱ्या सावित्री कोयारी यांच्या पती व भावाचे अपघाती निधन झाल्याने पतीच्या विम्याचे पैसे मिळाले होते. ते त्यांनी मालमत्ता खरेदीत गुंतवले होते. २०१८ साली सावित्री यांच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा मातेश्वर राजपत गिरी (४०) रा. एमआयजी कॉलनी, वांद्रे याने त्यांना गाठले. म्युचल फंडात आपण काम करत असून अनेकांना त्यांचे पैसे गुंतवून चांगला फायदा मिळवून दिला आहे. तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला देखील चांगला नफा मिळवून देणार असे आश्वासन मातेश्वर ने दिले.
दोन मुलींच्या लग्न आणि शिक्षणासाठी ठेवलेले पैसे एका परिचितानेच म्युचल फंडात गुंतवणूक करतो सांगून ३२ लाख ४६ हजारांना फसवल्या प्रकरणी मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
