कोकाटेना अखेर अजितदादांचे अभय! मंत्रिपदी कायम
मुंबई/ विधानभवनात ऑनलाईन रमी खेळण्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर शनिदेव पावला.एखाद्या भुरट्या गुन्हेगाराला ज्याप्रमाणे पोलिस दम देऊन सोडून देतात अगदी त्याच पद्धतीने अजित पवारानी माणिकराव कोकाटेना केवळ तंबी देऊन सोडून दिले .त्यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद बचावले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकाटेबाबत मंगळवारी निर्णय घेणार होते. त्यानुसारवाज त्यांनी कोकाटेना बोलावून त्यांची कानउघडणी केली….
