पंतप्रधान मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत पुणे मेट्रो-3 चे लोकार्पण; मेट्रो-2 विस्ताराचे भूमिपूजन
पुणे — पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीत महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या उपस्थितीत माण-हिंजवडी ते शिवाजीनगर अशा पुणे मेट्रो मार्गिका-3 चे लोकार्पण करण्यात आले. त्याच वेळी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार कामांचे भूमिपूजनही करण्यात आले.या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल, उपमुख्यमंत्री तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन म्हाळुंगे-बालेवाडी येथील…
