मौलाना शौकत अली मार्गावरील अनधिकृत फर्निचर विक्रेत्यांवर दणक्यात कारवाई, जेसीबीने चालवला बुलडोझर!
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाने मौलाना शौकत अली मार्गावरील जुने फर्निचर विक्रेत्यांवर तसेच इतर अतिक्रमणांवर कठोर कारवाई करून दाखवली. नुकताच सहायक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले आनंद कंकाळ यांच्या नेतृत्वात ही ‘आल्या आल्या दणक्यात’ मोहीम राबवली गेली. उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात पार पडलेली ही कारवाई अतिक्रमणविरोधातील ठाम भूमिकेचे उदाहरण ठरली.मौलाना शौकत अली मार्गावर,…
