माझगावच्या मोरया आगमन मिरवणुकीवर अंडी फेकणारा भायखळा पोलिसांच्या जाळ्यात; फटाक्यांच्या धुरामुळे संतापातून कृत्य केल्याची कबुली
मुंबई:प्रसिद्ध ‘माझगावचा मोरया’ गणपतीच्या आगमन मिरवणुकीवर अंडी फेकल्याच्या धक्कादायक घटनेचा भायखळा पोलिसांनी तातडीने छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी २४ तासांच्या आत दानिश शेर खान (वय २२) या तरुणाला अटक केली आहे.रविवार, २३ ऑगस्ट रोजी माझगावचा मोरया गणपतीची आगमन मिरवणूक मंडपापासून अवघ्या ३०-४० मीटर अंतरावर आली असताना शेजारच्या ‘कॉन्टिनेन्टल हाईट्स’ या इमारतीवरून मिरवणुकीवर अंडी फेकण्यात…
