मुंबई: (किसनराव जाधव )
जागतिक पातळीवरील हिंदू नेतृत्वाचा महाकुंभ मानली जाणारी ‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस २०२६’ (World Hindu Congress 2026) या भव्य परिषदेचे आयोजन यंदा भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे येत्या १८, १९ आणि २० डिसेंबर २०२६ दरम्यान ही परिषद होणार असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते या महाअधिवासनाचे उद्घाटन होणार आहे. मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेचे स्वामी विजयानंद यांनी ही सविस्तर माहिती दिली.
या तीन दिवसीय जागतिक परिषदेत जगातील तब्बल ६० देशांमधून सुमारे ४,००० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रख्यात हिंदू नेते, विचारवंत, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, माध्यम प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. जागतिक स्तरावर हिंदू समाजाचे योगदान, सांस्कृतिक एकात्मता, आणि भविष्यातील आर्थिक व सामाजिक विकासाच्या दिशेवर या परिषदेमध्ये सखोल मंथन केले जाणार आहे.
या उच्चस्तरीय परिषदेला देशातील आणि राजकारणातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहतील. तसेच, चित्रपटसृष्टीतून ‘हनुमान’ चित्रपटाचे लेखक विशाल चतुर्वेदी, उद्योजक व कॉर्पोरेट क्षेत्रातील मनोज ममता शिर्केतकार्पटकाता, आशिष कुमार चव्हाण (नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडिया), अश्विनी बडे, मुंबई महानगरपालिका आयुक्त घनश्याम प्रसाद, अभय करंदीकर (केंद्रीय विद्युत प्राधिकरण), संजय चक्रवर्ती (नीती आयोग), संजय (कॉर्पोरेट सेंटर उपाध्यक्ष), प्रधानमंत्री कार्यालयाशी संबंधित रवींद्र श्रीनाथ, सुमन सिंह (संस्थापक सीईओ), वेग राघवन (संस्थापक चेअरमन), मल्लिका बजाज, नवल पिच्छा (निर्देशक, शाश्वत गोयंका – व्हाईस चेअरमन), आणि अजय कुमार श्रीवास्तव (मॅनेजिंग डायरेक्टर) यांसारख्या अनेक नामवंत व्यक्ती विविध सत्रांचे मार्गदर्शन करणार आहेत.
जागतिक स्तरावर हिंदू विचारांची देवाणघेवाण करणे, नेटवर्किंग वाढवणे आणि विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणणे हा या काँग्रेसचा मुख्य उद्देश आहे. या आयोजनामुळे मुंबई शहरात जगभरातून येणाऱ्या पाहुण्यांचे जोरदार स्वागत होणार असून, या महापरिषदेच्या तयारीला अंतिम रूप देण्यात आले आहे.
हिंदूंनी एकत्र येऊन सावध राहण्याची गरज: स्वामी विजयानंद
मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत जनसत्ताच्या प्रतिनिधीने हिंदूंना सर्वधर्मसमभाव शिकवला जातो, मात्र इतरांच्या बाबतीत तसे का होत नाही, असा प्रश्न स्वामी विजयानंद यांना विचारला.
यावर उत्तर देताना स्वामी विजयानंद म्हणाले की, जगातील लढायांचे विश्लेषण तिथल्या परिस्थितीनुसार करणे गरजेचे आहे. परकीय राजाने भारतातील राजाला मारले यांना मारले; मात्र त्यापूर्वी येथील राजांना अनेक वेळा हरवले होते. परंतु, सततच्या क्षमाशीलतेमुळे आणि अनावधानाने झालेल्या घातपातामुळे तो पराभव झाला. त्यामुळे आता हिंदूंनी इतिहासबाट बोध घेत एकत्र येणे आणि सावध होणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले.
