सन्मान मराठी पत्रकारितेचा…
फुटबॉल विश्वचषकाच्या यजमान शहरातून, मेक्सिको सिटीच्या भूमीतून मी हे लिहित आहे. ही केवळ एक नगरी नाही; ही फुटबॉलच्या इतिहासाची जिवंत साक्षीदार नगरी आहे. याच शहराने जगाला एक असा नायक दिला, ज्याला काळाच्या ओघात देवत्व प्राप्त झाले. १९८६ मध्ये याच ऐतिहासिक स्टेडियमवर दिएगो मॅराडोनाने अर्जेंटिनाला दुसरे विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि स्वतःला फुटबॉलच्या अमर गाथेत कोरून ठेवले….
