| रियाध:सौदी अरेबियातील मक्का येथील पवित्र मशिदीच्या परिसरात ‘अनैतिक कृत्य’ करून धार्मिक स्थळाचे पावित्र्य भंग केल्याच्या आरोपाखाली नझरुल इस्लाम अब्दुल बासिर आणि सिती अख्तर या दोन बांगलादेशी नागरिकांना १४ ऑक्टोबर २०२६ रोजी फाशी (मृत्यूदंड) देण्यात आली. अनेक आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये या दोघांचा उल्लेख बांगलादेशी जोडपे असा केला गेला आहे.
सौदी गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, मशिदीत मर्यादा ओलांडणारे कृत्य केल्याप्रकरणी न्यायालयाच्या ‘ताझिर’ (Ta’zir) नियमांतर्गत न्यायाधीशांनी त्यांना मृत्युदंडाची कठोर शिक्षा सुनावली. नझरुल हा या परिसरात सफाई कामगार म्हणून कार्यरत होता.
दरम्यान, या घटनेनंतर बांगलादेश आणि सौदी अरेबियादरम्यान मोठा राजनैतिक वाद निर्माण झाला आहे. या फाशीची किंवा न्यायालयीन खटल्याची कोणतीही पूर्वकल्पना सौदी प्रशासनाने बांगलादेश दूतावासाला दिली नव्हती. ‘व्हिएन्ना करारा’चा भंग झाल्याचा आरोप करत बांगलादेश सरकारने ढाका येथील सौदी राजदूतांना समन्स बजावून यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
