मंदिराच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहून दंगल भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ४ हिंदू तरुणांना अटक
अलिगड /उत्तर प्रदेशातील अलिगढमधील लोढा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या चार हिंदू मंदिरावर पेंट स्प्रेने आय लव्ह मोहम्मद असे लिहिण्यात आले होते. २५ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला होता. तणाव निर्माण कृत्य करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी गुरुवारी (३० ऑक्टोबर) अटक केली आहे. आय लव्ह मोहम्मद लिहिणारे चारही तरुण हिंदू असून, त्यांनी जमिनीच्या वादातून हे केल्याचे पोलिसांनी सांगितले.लोढा…
