जळगाव/निवडणुकांमधील मशीनच्या मुद्यावरुन अनेकदा आरोप-प्रत्यारोप आणि शंका उपस्थित केली जाते. तर याच मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे ईव्हीएममध्ये कुठलीही छेडछाड शक्य नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वेळो वेळी देण्यात आलं आहे. असे असताना जळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुनंदा भागवत फेगडे या महिला उमेदवाराला 0 (शून्य) मतदान मिळाल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्या महिला उमेदवाराचा सरळ आणि साधा प्रश्न असा आहे की मी स्वतःला सुद्धा मतदान केले नाही का? याचे उत्तर कोण देणार? बामसेफ बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम संपूर्ण देशभरात वारंवार सांगत आहे की ईव्हीएम मशीनमध्ये गडबडी होते, हा त्याचा पुरावा, असल्याची प्रतिक्रिया सुनंदा फेगडे यांनी दिलीय.माझ्या घरातल्या लोकांचे मत जाऊ द्या, पण माझं स्वतःचं मत तर मी मला दिलं होतं, मग ते मत कुठे गेलं?’आता या प्रश्नाचं उत्तर कुणी द्यायचं? मत इ व्ही एम मध्ये गेलं कि निकाल भाजपला गेला आणि प्रश्न विचारला की निवडणूक आयोग शांत. उत्तर मात्र भाजपकडून येतं! म्हणजे, इ व्हि एम सरकारी, निवडणूक आयोग घटनात्मक, पण स्पष्टीकरण मात्र पक्षीय. आजची लोकशाही अशी झालीय की बटन मतदार दाबतो निकाल मशीन ठरवतं आणि खुलासा पक्ष देतो, अशी संतप्त सवाल करत जळगाव प्रभाग (1-अ) मधील अपक्ष उमेदवार सुनंदा फेगडे यांनी इ व्ही एम वर आक्षेप घेतला आहे.

