कर्नाटक- येथे दिनांक १३/११/२०२१ ते १४/११/२०२१ या दरम्यान राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा (Rural Game Roller Skating National Championship-2021) आयोजित करण्यात आली. स्पर्धेत इतर राज्यांसोबत महाराष्ट्र राज्याचे खेळाडू ही सहभागही झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघा तर्फे वांद्रे(पू) मुंबई येथील क्षितिज स्पोर्ट्स क्लब चे कुमार श्रवण संदीप गावडे (U-16 speed quad), कुमार चिरायू शत्रुघ्न गावडे(U-13 speed quad) आणि कुमार कृष्णा संतोष जैस्वाल(U-12 speed inline) चे स्पर्धक सहभागी झाले होते. या तिन्ही खेळाडूंनी स्पर्धेत नेत्र दीपक कामगिरी केली आहे. सदर स्पर्धेत कुमार श्रवण संदीप गावडे याने U-16 speed quad गटातील 1000m व 500m या दोन्ही विभागात सुवर्ण पदक पटकावले आणि कुमार चिरायू शत्रुघ्न गावडे याने U-13 speed quad गटातील 1000m व 500m या दोन्ही विभागात कास्यापडक पटकावले. या दोन्ही खेळाडूंची आता आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. गेले आठ वर्ष वांद्रे पूर्व येथील क्षितिज स्पोर्ट्स क्लब याची वाटचाल प्रशिस्क निखिल विजय तांबे आणि प्रशिक्षक यश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती पथावर सुरू आहे. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक निखिल सर व यश सर यांना प्रामुख्याने दिले आहे.
Similar Posts
त्या महिलेच्या जीवाला राहुल शेवाळे कडून धोका र
पुणे – ज्या महिलेशी खासदार राहुल शेवाळे यांचे संबंध असल्याची चर्चा सुरु आहे ती मुंबई पोलिसांच्या समोर यायला तयार आहे . पण तसे झाल्यास तिच्या जीविताला राहुल शेवाळे कडून धोका निर्माण होऊ शकतो असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोबरे यांनी केल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे . त्यांच्या या आरोपामुळे शेवाळेंच्या अडचणी आणखी वाढलेल्या आहेत…
राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ अजित पवार गटाला – शरद पवार सुप्रीम कोर्टात जाणार
नवी दिल्ली – राष्ट्रवादीच्या आधी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगासमोर होता. त्यावेळी आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाचं असल्याचं सांगत तेच खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं. अगदी तसाच निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत झाला आहे . निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिला आहे.शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या…
जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन
मुंबई/ मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आभल्या अभ्णयाचा ठसा उमटवणारे जेष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक रमेश देव यांचे बुधवारी हार्ट अटकने वयाच्या ९३ वया वर्षी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी सीमा पुत्र अजिंक्य व अभिनय तसेच सूना नातवंडे असा परिवार असून गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत३० जानेवारी १९३० साली जन्मलेल्या रमेश देव यांनी १९५१ आली…
सरपंच हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन – वाल्मिक कराडच्या साथीदारांचा शोध सुरु
बीड – सरपंच हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आला आहे. तसेच खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मीक कराडला अटक देखील करण्यात आली आहे. वाल्मीक कराडला आता १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याचसोबत आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. शासनाकडून आता आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली…
कार्यकारी अभियंता पाडुरंग दाभाडे निवृत्त होणार
मुंबई- आपल्या चांगल्या कामाने व मनमिळावू स्वभावाने सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय कार्यकारी अभियंता पांडुरंग नामदेव दाभाडे लवकरच निवृत्त होणार आहेत ते पर्जन्य जलवाहिनी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. 1990 साली रस्ते विभागात रुजू झालेल्या पांडुरंग दाभाडे यांनी पुढे दक्षता विभाग, इमारत कारखाने आदी विभागात काम केले. पर्जन्य जलवाहिनी शहर कार्यकारी अभियता असा यशस्वी कर्तव्य बजावले. …
अखेर पालिकेतील प्रभारींना बढती
मुंबई – सध्या पालिकेचा कारभार प्रभारींच्या हाती आहे. त्यामुळे नागरी सुविधांच्या कामांना कुठेतरी खिळ बसली आहे अशा स्थितीत पालिकेतील प्रमुख अभियंता पदाची जबाबदारी गेल्या दीड ते २ वर्षांपासून प्रभारींच्या खांद्यावर होती. प्रभारी म्हटला कि त्याच्या कामावर आणि अधिकारांवर मर्यादा येतात परिणामी त्याचा फटका त्यात्या विभागातील कामांना बसतो. याबाबत मुंबईकर जनतेने अनेक वेळा आवाज उठवूनही पालिका…
