कल्याण/ रेल्वे प्रवासासाठी दोन डोस ची सक्ती तसेच कोरोनची वाढती भीती यामुळे लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत आहे आणि याच वाढत्या गर्दीमुळे काही लसीकरण केंद्रावर हाणामारीचे प्रकार घडत आहेत काल कल्याणच्या हॉली क्रॉस रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झाली सुरवातीला बाचाबाची होऊन नंतर शिवीगाळ झाली आणि त्या नंतर या दोन्ही तरुण एकमेकींना भिडल्या आणि हाणामारी सुरू झाली यावेळी रांगेतल्या इतर लोकांनी तसेच लसीकरण केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे भांडण सोडवून त्यांना शांत केले कल्याण डोंबिवली मध्ये लसीचा तुटवडा असल्याने लोक लसीकरण केंद्रावर रात्री बारा वाजल्यापासूनच रांगा लावताना दिसतात अशावेळी जास्त गर्दी झाल्यावर भांडणे आणि हाणामारी सुरू होते त्यामुळे कल्याण डोंबिवली साठी लसीचा जादा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी कल्याण डोंबिवली महापालिकेने केली आहे
Similar Posts
दक्षिण मुंबईत पुन्हा बेकायदेशीर पार्किंग वसुली सुरू
मुंबई/ पे अँड पार्क ची कंत्राटे सह महिन्यापूर्वीच संपलेली आहेत तरीही चर्चगेट,नरिमन पॉइंट,सी एस टी मरीन लाईन या भागातील वाहन तलांचा ताबा काही गुंडांनी घेतलेला असून त्यांच्या कडून बेकायदेशीर पार्किंग चार्ज वसूल केला जातोय काही ठिकाणी पावत्याही दिल्या जात नाही तर काही ठिकाणी या लोकांनी बनावट पावत्या बनवून वसुली सुरू केली आहे दुचाकी वाहनांसाठी 20…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयचंदू दादा आणि राज चे “मनसे” गुफ्तगू होणार
आज चंदू दादा आणि राज चे “मनसे” गुफ्तगू होणारमुंबई/ भाजप आणि शिवसेना यांच्यातील २३वर्षांची युती तुटून भाजपच्या हातून सत्ता गेल्यानंतर आता भाजप महाराष्ट्रात नव्या जोडीदाराच्या शोधात असून त्यासाठीच मनसेला सोबत घेण्याची चाचपणी सुरू आहे . त्याचाच एक भाग म्हणून आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार आहे.त्यामुळे आता या दोन…
मराठी एकजुटीचा दणक्यानंतर पोलिसांची मोर्चाला परवानगी मीरारोडमधे मराठ्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
मीरा रोड/मराठीच्या विरोधात काढलेल्या मोर्चाला संरक्षण देणाऱ्या पोलिसांनी, मराठ्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करताच, संतप्त झालेला मराठी माणूस रस्त्यावर उतरला. इतकेच नव्हे तर मुंबईसह आसपासच्या शहरांमधील सर्व मराठी मीरारोडच्या दिशेने निघाले होते त्यामुळे घाबरलेल्या सरकारने अखेर मोर्चाला परवानगी दिली.मराठी माणसांच्या एकजुटीसमोर फडणवीस सरकारला दुसऱ्यांदा गुडगे टेकावे लागले.तर मराठ्यांच्या या अभूतपूर्व शक्तिप्रदर्शनाचा, मराठी विरुद्ध…
महाराष्ट्रात पावसाने उडवला हाहाकार – १० जिल्ह्यांमधील शाळा कॉलेज आज बंद
बिल्डर आणि पालिका अधिकाऱ्यांच्या युतीने पुणे बुडवले पुणे -राज्यात आज सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. शिवाय काही जिल्ह्यांना उद्या रेड अलर्टही जारी करण्यात आलाय. त्यामुळे अपत्कालीन परिस्थितीसध्या रायगड जिल्ह्यातील अनेक नद्या ओसांडून वाहत आहेत, प्रशासन प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आहे अशावेळी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून उद्या देखील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय –…
शिंदे गटाचे मुंबईतील उमेदवार जाहीर – दक्षिण- मुंबईतून यामिनी जाधव तर उत्तर – पश्चिममधून रवींद्र वायकर उत्तर मुंबईतून कॉंग्रेसचे भूषण पाटील
मुंबई – दक्षिण मुंबई आणि उत्तर -पश्चिम मुंबईतून शिंदे गटाचे उमेदवार कोण याबाबत सर्वाना मोठी उत्सुकता होती अखेर आज या दोन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले. दक्षिण मुंबईतून शिंदे गटाच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली . त्यामुळे या मतदार संघासाठी देव पाण्यात बुडवून असलेले भाजपचे राहुल नार्वेकर यांचा पत्ता कट झाला. आता…
मनरेगा योजनेतून गांधीजींचे नाव हटवल्याने देशभर संताप
नवी दिल्ली/मोदी सरकारने गेल्या दोन दशकांपासून चालू असलेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सध्या चालू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नवे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकाच्या माध्यमातून मनरेगा योजनेचे स्वरुपही बदलण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेतील महात्मा गांधी यांचे नाव बदलून या योजनेचे नाव आता ‘विकसित भारत…
