काँग्रेसच्या शिबिरास उशिरा पोहचलेल्या राहुल गांधीना १० पुश अपची शिक्षा
भोपाळ/मध्यप्रदेशातील पचमढीत सुरू असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधींना दोन मिनिटांचा उशीर महागात पडला. शिबिरातील अनुशासन मोडल्यामुळे काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना काढण्याची शिक्षा देण्यात आली. काँग्रेसने सर्वांसाठी समान नियम असल्याचा दावा केला असला तरी, या घटनेने पुन्हा एकदा राहुल गांधींची शिस्त अधोरेखीत झाली आहे.काँग्रेसचे मीडिया समन्वयक अभिनव बरोलिया यांनी सांगितले की,…
