पालघर साधू हत्याकांडातील चौघांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला
मुंबई / पालघर हत्याकांडातील चौघांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. प्रथमदर्शनी आरोपींविरोधात पुरेसे पुरावे असल्याचं सांगत न्यायालयानं हा जामीन अर्ज फेटाळला. १६ एप्रिल २०२० रोजी, राज्यात कोरोना लॉकडाऊन सुरू असताना गडचिंचले गावातील जमावाने दोन साधूंसह त्यांच्या चालकाची हत्या केली होती. याप्रकरणी राजेश राव, सजनुआ बुरकुड, सुनील दळवी आणि विनोद राव या चौघांवर आरोप आहे….
