मुंबई/निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर देशभरातून संशय व्यक्त केला जात असतानाच निवडणूक आयोगाने आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.त्यानुसार निवडणूक निकालाचा कालावधी संपल्यानंतरही उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकतो.मात्र याच निर्णयामुळे उमेदवारांना घरोघरी जाऊन पैसे वाटण्याची मुभा मिळणार आहे.
महाराष्ट्रा मध्ये येत्या २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. महापालिकांच्या निवडणुकीच्या मतदासाठी काही तास शिल्लक असताना मुंबईतील निवडणूक विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही मुंबईतील उमेदवाराला घरोघर प्रचार करण्याची मुभा दिली आहे. या अजब निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी १३ जानेवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे. मात्र याचदरम्यान निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रचार कालावधी संपल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेतील उमेदवाराला घरोघर प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघर जाऊन प्रचार करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांनी महानगरपालिकेच्या ए, बी आणि ई विभागातील सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांची नुकतीच एक बैठक घेतली होती. त्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये हा अजब निर्णय नमूद आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांना 13 जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. परंतु त्यानंतरही १५जानेवारीपर्यंत ते घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील, मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची पत्रके वाटता येणार नाहीत, असे इतिवृत्तामध्ये नमूद आहे. याशिवाय बैठकीत घेतलेल्या इतर निर्णयांचाही त्यात समावेश आहे.निवडणूक आयोगाची महापालिका निवडणूक प्रचाराची वेळ 13 जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगाने 13 ते १५ जानेवारी दरम्यान पत्रके न वाटता घरोघरी जाऊन प्रचाराला परवानगी दिली आहे. राज्यभरत हे प्रथमच घडत आहे. कोणत्याही निवडणुकीचा प्रचार ४८तास आगोदर संपतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेलाहा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे मुंबईकर मतदारांवर पैशाचा पाऊस पडणार आहे.निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे मतदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.तर मुंबईत भाजपाला पराभवाची भीती वाटत असल्यानेच असा निर्णय निवडणूक आयोगास घेण्यास लावला असा आरोप विरोधकांनी केला आहे.

