मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वार्ड क्र. 199 मधून शिवसेना (उद्धव ठाकरे गट)च्या नेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भव्य विजय मिळवला! त्यांना 12786 मते मिळाली, तर शिंदे गटाच्या रुपल राजेश कुसळे यांना11097 मते मिळाली. लढत चुरशीची झाली. थोडया मतांच्या फरकाने किशोरी पेडणेकरांनी त्यांचा चांगलाच धक्का दिला! रुपल कुसळे या माजी शाखाप्रमुख राजेश कुसळेंच्या पत्नी आहेत. निवडणूक काळात आरोपत्यारोपाच्या हायव्होल्टेज फेरी झडल्या, त्या मध्ये या दाम्पत्यावर बेनामी संपत्तीचे आरोप झाले तर किशोरी पेडणेकरांवर माहिती लपविली हा मुद्दा काढण्यात आला. मात्र किशोरी पेडणेकर सातत्याने वार्डातील विकासकामे करणार्या कार्यकर्त्यामध्ये काम असल्याने येथील विकास प्रकल्प त्यांच्या पुढाकाराने उभे राहिले. कोविड काळात त्यांचे उत्कृष्ट काम जनतेने विसरली नाही. म्हणूनच मतदारांनी त्यांना पुन्हा निवडून दिले.
मुंबईत शिवसेना ठाकरेंची
शिवसेना कोणाची या प्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालया त चालू असला तरी मुंबईने त्याचा निकाल लावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या तर राज ठाकरेंच्या मनसेला 6 जागा मिळाली तर शिंदे सेना 28 जागा वर समाधान मानावे लागले. सर्वात जास्त भाजपने ८९ जागा जिंकून मुंबई महापालिकेतील तीन दशक कायम असलेली ठाकरेंची सत्ता उलथवून लावत मुंबईची सत्ता काबीज केली. ठाकरेंची सेना यामध्ये फद फितुरी होऊ ही 65 जागा खेचून आणले. दोघे ठाकरे भाऊ एकत्र आल्याने भाजप समोर मोठे आव्हान पालिकेत उभे राहिले आहे. काँग्रेसला मात्र स्थानिक नेत्यांचा दगा फटका भोवला . फक्त 24 जागा वर समाधान मानावे लागले. वंचित युती त्यासाठी काढलेलं उशिर आणि चर्चा, उमेदवारांची निवड याचा फायदा एम आय एम पक्षाला 8 जागा आणि समाजवादी पक्षाला 2 जागा फायदा झाला.

