मुंबई/ नवाब मलिक आणि भाजपचा मोहित कंबोज यांच्यात आरोप प्रत्यारोपाची चिखलफेक सुरू असतानाच एन सी बी चां खबरी अशी ओळख निर्माण झालेला सुनील पाटील काल प्रसार माध्यमांच्या समोर प्रकटला आणि किरण गोसावी व भानुशाली हेचव्या प्रकरणाचे मास्टर माईंड असून भाजप नेत्यांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचे त्याने सांगितल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे तत्पूर्वी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन मोहित कंबोज हाच या प्रकरणातला मास्टर माईंड असल्याचे सांगितले त्यावर पलटवार करताना मग मलिक इतके दिवस गप्प का राहिले . न्यायालयाच्या नोटिशिला त्यांनी उत्तर का नाही दिले असे म्हणत मलिक यांचे आरोप बिनबुडाचे असून ते घाबरले असल्याचे मोहितेने सांगितले तर दुसरीकडे ज्या सुनील पाटीलचे सम डिसोजा याने नाव घेतले होते .त्याने आपल्याकडे क्रुझ वरच्यारेच पार्टी मध्ये भाग घेणाऱ्यांची लिस्ट आली होती . ती मला एम पी मधील एका भाजप नेत्याच्या नीरज यादव नावाच्या माणसाने दिली पण त्यात आर्यनचे नाव नव्हते शाहरुख खान कडून पैसे काढण्यासाठी किरण गोसावी भानुशाली आणि इतरांनी हा डाव रचला असावा .माझ्या जिवाला भाजप नेत्यांकडून धोका असल्याने मी घर सोडून गेलो होतो असे पाटील याने सांगितले त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे
Similar Posts
बांगलादेशमध्ये मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली अंतरीन सरकारचा शपथविधी – नव्या सरकारकडून कोणत्याही अपेक्षा नाही बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार सुरूच
ढाका/आज बांगलादेश मध्ये शांततेचे नोबल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली 17 सदस्यांचे अंतिम सरकार स्थापन झालेले आहे या सरकारमध्ये 16 मंत्री असतील मात्र ज्यांनी बांगलादेशमध्ये दंगली घडवल्या हिंदूंना टार्गेट केले ते विद्यार्थी आंदोलनाचे दोन नेते मोहम्मद इनोस यांच्या मंत्रिमंडळात असतील त्यामुळे सरकार जरी आले तरी हिंदूंवरील अत्याचार थांबणार नाहीत त्यामुळेच भारत सरकारने तसे उन्होने…
“विकसित भारताचा” मार्ग चाचपून पहाण्याची आवश्यकता !
जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश अग्रगण्य देशांमध्ये होणार असल्याचे नगारे गेली काही वर्षे वाजत आहेत. 2047 पर्यंत ‘विकसनशील’ भारताचे रुपांतर ‘विकसित’ भारतात करण्याचे महत्वाकांशी उद्दिष्ट मोदी सरकारने ठेवले आहे. प्रत्यक्षात सध्याची आर्थिक धोरणे, विद्यमान परिस्थिती, जागतिक पातळीवरील आर्थिक व भू राजकीय घडामोडी यांचा आढावा घेतला तर ‘विकसित ‘ भारताकडे जाण्याचा खात्रीशीर मार्ग सापडला असल्याचे जाणवत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेच्या नंतर राष्ट्रवादी टार्गेट- पत्रा चाळ – पवारांशी नाळ?
मुंबई/ पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत याना फीट केल्यानंतर आता या प्रकरणात भाजपने पवारांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .त्यासाठी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून पवारांच्या चौकशीची मागणी केली आहे.गोरेगावच्या पत्रचाल पुनर्विकास प्रकल्पात संजय राऊत हेच असल्याची माहिती इडी च्या अधिकाऱ्यांकडे आहे या प्रकल्पाच्या निमित्ताने इथे राहणाऱ्या रहिवाश्यांना फसवण्यात आले ….
दिवंगत मनोहर जोशींसह अभिनेते अशोक सराफ यांच्यासह १४३ जणांना पद्म पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/ प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते.महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी अभिनेते अशोक सराफ दिदर्शक शेखर कपूर यांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले. यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतरत्न पुरस्कारानंतर पद्म पुरस्कार हा प्रतिष्ठेचा मानला जातो. देशाच्या सर्वोच्च नागरिक सन्मानांपैकी एक असलेला पद्म पुरस्कार हा…
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी झाला जगज्जेता
महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला जगज्जेतेपद जागतिक पोलिस अँड फायर गेम्समध्ये भारताला जिंकून दिले सुवर्ण कॅनडाच्या गतविजेत्या जेसी साहोताचा केला पराभव.विनिपेग (कॅनडा), दि.३० (क्री.प्र.)- महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता आणि अप्पर पोलिस अधीक्षक विजय नथ्थू चौधरीने भारतासाठी सोनेरी कामगिरी केली. कॅनडाच्या विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळात कॅनडाच्या…
लतादीदींबद्दलचे गैरसमज त्यांच्या हयातीत दूर झाले ही सुखावणारी बाब ; बोरीवली येथे गानसम्राज्ञीला भावपूर्ण श्रद्धांजली !
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या बद्दल ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या अजरामर ऐतिहासिक गीताच्या निर्मिती नंतर झालेला गैरसमज त्यांच्या हयातीत दूर होणे, ही त्यांच्या आयुष्यातील सुखावणारी बाब म्हणावी लागेल, लतादीदी या शरीराने जरी आपल्यात नसल्या तरी आपल्या सर्वांच्या आयुष्यात स्वररुपाने त्या सदैव आपल्यात आहेत, अशा…
