मुंबई/ बँकांचे खातेदार हे खरे तर बँकांसाठी साक्षात ईश्वरा प्रमाणे असतात कारण त्यांनी बँकेत जमा केलेल्या पैशावराच बँका चालतात पण आजकाल बँका खातेदारांच्या बाबतीत भेदभाव करायला लागल्या आहेत .कारण बऱ्याच बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी पुरेसे पुरावे नसले तरी खाते उघडले जाते अगदी पॅन कार्ड किंवा आधारकार्ड सुधा पाहिले जात नाही तर दुसरीकडे छोट्या धंदेवल्यांच्या खात्यावर मात्र बँकांची करडी नजर असते .खात्यात्वपुरेशी रक्कम नसल्यास दंड आकारला जातो बँकेत ट्रूजकन्शन झाले नसल्याच्या कारणावरून किंवा के सी वाय च्या खाली हेलपाटे मारायला लावले जातात . उदाहरणार्थ पालिकेच्या नियमानुसार पाच किंवा जास्त कामगार असेल तरच गुमस्ता रजिस्ट्रेशन केले जाते मात्र गेल्या अधिक वर्षात अनेक छोट्या व्यापाऱ्यांना जागा सोडाव्या लागल्या अशा अवस्थितीत त्यांना के वाय सी साठी त्रास देतो .त्यामुळे छोटे व्यापारी बँकांच्या या सिस्टमला वैतागले असून याबाबत रिसर्च बँकेने लक्ष लक्ष घालून छोट्या व्यापाऱ्यांची या बँकांच्या त्रासातून सुटका करावी अशी मागणी छोट्या व्यापाऱ्यांनी केली आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर – माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीचे बांधकाम तोडले
मुंबई/ भाजपच्या मिळमिळीत हिंदुत्व पेक्षा ज्वलंत हिंदुत्व काय असते आणि जहाल हिंदुत्ववाद्यांचा एका इशाऱ्यावर. प्रशासनाची सुधा कशी फाटते हे राज ठाकरेंनी दाखवून दिले आहे. पाडव्याच्या शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्याचे काम कसे सुरू आहे याची माहिती दिली आणि हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर तिथेच भव्य दिव्य गणपतीचे…
सरकारकडून मिळणारा आनंदाचा शिथा इतिहास जमा! शिंदेंच्या महत्वकांक्षी योजनेला फडणवीसांची कात्री
मुंबई/महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वकांक्षी योजना सुरू केल्या होत्या ज्यामध्ये लाडके बहीण योजना महिलांना एसटीचा प्रवासात अर्धे भाडे ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा यासह सणासुदीच्या काळात आनंदाचा शिरा देण्याच्या योजनेचा समावेश होता परंतु मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे यांच्या काही योजनांना कात्री लावली…
मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये मराठीची गळचेपीमराठीतील पोलिस -एफआयआर स्वीकारण्यास युनियन बँकेचा नकार
नागपूर : मराठीसाठी महाराष्ट्रात आंदोलने सुरू असतानाच केवळ मराठीत एफआयआर केला म्हणून युनियन बँकेने एका अपघातप्रकरणात नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये हा संतापजनक प्रकार घडलाय.घरातील एकमेव कमावत्या तरुणाच्या मृत्यूनंतर नुकसानभरपाई मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या त्याच्या गरीब कुटुंबाची जर भाषेपायी अडचण केली जात असेल, तर तुम्ही काय म्हणणार? जर कागदोपत्री पुरावे ( पोलिस…
एस टी कामगारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; संप सुरूच
मुंबई/ राज्यसरकार मध्ये विलिनिकरन मुद्द्यावर असून बसलेल्या एस टी कामगारांनी काल कृष्ण कुंज वर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली यावेळी आत्महत्या करू नका कारण आत्महत्या करणाऱ्यांचे मी नेतृत्व करीत नाही असे राज यांनी एस टी कामगारांना सांगितले .तसेच तुमच्या मागण्यांसाठी आपण सर्व प्रकारची कायदेशीर लढाई लढू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे…
भाई जगताप यांची उचलबांगडी -मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्ष गायकवाड
मुंबई/ मुंबई महापालिकेची निवडणूक आता कधीही होऊ शकते या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे तर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने दलीत कार्ड खेळले आहे.महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसने मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दलित महिलेची नियुक्ती केली आहे. त्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी करुंन त्यांच्या जागी वर्ष गायकवाड यांची नियुक्ती केली…
पालिका निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची फेरतपासणी होणार ?
नवी दिल्ली/विरोधी पक्षाने मत चोरीच्या विरुद्ध आंदोलन छेडले आहे.तसेच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.त्यामुळे निवडणुकीत पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक आयोग पालिका निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची फेरतपासणी करणार असल्याचे समजते.केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग देशभरात मतदार याद्यांची फेरतपासणी करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय…
