[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अजूनही निष्ठा

शिवसेनेत भलेही बंडखोरी झालेली असली तरी काही बंडखोरामध्ये आजही ठाकरे कुटुंबाच्या विषयी आदर आणि थोडीफार निष्ठा आहे.त्यामुळे ठाकरे घरण्या विषयी कोण काही बोलले तर ते त्यांना सहन होत नाही पण त्याची किंमतही त्यांना मोजावी लागणार आहे.कारण शिवसेना ज्या उद्देशाने फोडण्यात आली त्यांना शिवसेना नामशेष करायची आहे त्यामुळे शिवसेनेतून फुटलेल्या माणसाने ठाकरे परिवाराचे गुणगान गायले की त्यांचा तीळ पापड होतो.नुकतेच शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना भाजप युती विषयी गौप्यस्फोट करताना राणे विषयी जे विधान केले होते त्यामुळे राणे कुटुंबीय नाराज झाले आणि त्यांनी फडणवीस यांच्याकडे तक्रार करून केसरकर याना शिंदे गटाच्या प्रवक्ते पदावरून दूर केले .निष्ठेला ही एक प्रकारची शिक्षा आहे आणि भविष्यात या सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत त्यामुळे शिंदे गटातील बंडखोरांनी आता सावध राहावे तसेच भाजप आणि फडणवीस यांच्या समोर वाजण्याची मानसिकता ठेवावी.वास्तविक केसरकर यांच्यासारखा हुशार माणूस शिंदेंना शोधूनही सापडणार नाही पण केवळ राणे आणि भाजपची मर्जी राखण्यासाठी शिंदेंनी केसरकर याना बाजूला केले त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात काय फरक आवेत आज केसरकरांनी कळले असेल

महविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने खूप खर्च केला असे बोलले जाते आणि तसे असेल तर हा सगळं खर्च वसूल केला जाणार आहे आणि त्यासाठी शिंदे यांच्या सोबत बंद केलेल्या आमदारांनी त्यांच्या सोबत एकजुटीने राहणे गरजेचे आहे पण तसे होईल की नाही काही सांगता येत नाही कारण ठाकरे घरण्यावरच्या निष्ठेचे दीपक आजही बंडखोरांच्या गटात तेवत आहेत आणि जशी दीपक केसरकर याना उप्राती झाली तशी त्यांनाही होईल आणि ते स्वगृही परततील कारण ते ज्या अपेक्षेने भाजपा सोबत गेले आहेत त्या अपेक्षा कदापि पूर्ण होणार नाहीत शिंदे यांच्यासह त्यांच्या सर्व बंडखोर सहकाऱ्यांना भाजपच्या दबावाखाली राहावे लागणार आहे त्यातच सर्वोच्च न्यायालयाने जर त्यांना अपात्र ठरवले तर त्यांची आणखी पंचायत होणार आहे ग्रामपंचायतीच्या निववडणुकित शिंदे गटाला 40 जागा मिळाल्या असल्या तरी हा निकाल म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम ठरू शकतं नाही कारण शिवसेना अजून संपलेली नाही आणि संपणार सुधा नाही त्यामुळे जर मध्यवर्ती निवडणुका लागल्या तर शिंदे गट फार मोठे यश मिळवू शकतो .असा जो भाजपला विश्वास वाटतोय तो फोल ठरणार आहे.क्रारन शिंदे गटाची बंडखोरी महाराष्ट्रातील जनतेला आवडलेली नाही त्यामुळे विधानसभेचा निकाल वेगळा असेल शिवाय मतांची विभागणी भाजप आणि शिंदे गट यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकते आणि त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला होऊ शकतो खास करून राष्ट्रवादी अजूनही स्ट्राग आहे आणि जोवर पवार आहेत तोवर महाराष्ट्रात भाजपची डाळ शिजणार नाही येवढं मात्र नक्कीच कारण बंडखोर गटातील ठाकरे निष्ठेचे दीपकच शिंदेच्या तांबूल आग लावतील आणि त्याचे भाजपलाही चटके सहन करावे लागतील

error: Content is protected !!