मुंबई/ तब्बल 38 दिवसांच्या😭 नंतर भाजपा शिंदे गटाच्या सरकारचां मंत्रिमंडळ विस्तार झाला दोन्हीकडच्या प्रत्येकी 9 या प्रमाणे काल 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यात बलात्काराचा आरोप असलेले असलेले संजय राठोड आणि टी ई टी घोटाळ्याचे आरोप झालेल्या अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे मात्र या 18 जणांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याने महिलांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे
काल सकाळी 11 वाजता दरबार हॉल मध्ये राज्यपाल भगतसिंग कोशरी यांनी भाजपच्या 9 आणि शिंदे गटाची 9 अशा 18 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.या नव्या मंत्रिमंडळात महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांचाच समावेश आहे .केवळ शिंदे गटाकडून औरंगाबादचे अतुल सावे यांचा समावेश करण्यात आला आहे तर शिंदेंच्या अगदी जवळचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय शिरसाट याना वगळण्यात आले आहे भाजपनेही आशिष शेलार,प्रवीण दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सारख्या दिग्गजांना बाजूला ठेवले आहे त्यामुळे सरकारमध्ये असंतोष उसळण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळाच्या विस्तार नंतर सुप्रिया सुळे यशोमती ठाकूर प्रियांका चतुर्वेदी या महिला नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे तर संजय राठोड यांच्या विरुद्ध आपला लढा सुरूच राहील असे जाहीर करून भाजपा नेत्या चित्र वाघ यानि पक्षाला घरचा आहेर दिला आहे .
मंत्री मंडळ
शिंदे गट
दादा भुसे,उदय सामंत,गुलाबराव पाटील,संजय राठोड, अब्दुल सत्तार,,दीपक केसरकर,तानाजी सावंत,संदीपान भूम्रे ,शंभूराजे देसाई
भाजपचे मंत्री
सुधीर मूंगटीवार
गिरीश महाजन
रवींद्र चव्हाण
विजयकुमार गावित
मंगल प्रभात लोढा
सुरेश खाडे
राधाकृष्णन विखे पाटील
चंद्रकांत दादा पाटील
अतुल सावे .
