मास्क बाबतचा निर्णय 15 दिवसात!
मुंबई/ करोना पुन्हा एकदा भारतात परतला असून देशात 24 700 करोना रुग्णांची नोट झाली आहे . तर महाराष्ट्रात दिवसालाजवळपास दीड हजार करोना बधितांची नोंद होत आहे त्यामुळे येत्या 15 दिवसात मास्क सक्तीचा निर्णय सरकार घेणार आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले .
करेनाची वाढती लोकसंख्या पाहता गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स च्या डॉक्टरांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना बोलवून करोताच्या स्थितीचा आढावा घेतला होता आणि त्यानंतर मास्क सक्ती तूर्तास नसली तरी गर्दीच्या ठिकाणी जाताना लोकांनी मास्क वापरावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते . पण त्याबाबत कुणीही गांभीर्याने घेतलेले नाही बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहर याने 50 वय वाढ दिवसाची पार्टी दिली या पार्टीत अनेक सेलिब्रिटी सामील झाले होते त्यातील काही करोना बाधीत झाल्याचे समजते तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा करोना झाला आहे या पार्श्वभूमीवर येत्या 15 दिवसात सरकार मास्क सक्तीचा निर्णय घेणार आहे
