मुंबई/गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन घोटाळ्यावरुन भाजप उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेरत आलंय. आज त्याच अजित पवारांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारात सिंचन घोटाळ्यावरुन पलटवार केला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता १९९९साली आली. मात्र त्याआधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी केलाप्रकल्पाची किंमत २००कोटी रुपयेच असल्याच एका अधिकाऱ्याने कबुल केल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तर त्यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या सरकारने फंडासाठी प्रकल्पाच्या किंमतीत १०० कोटी मागितले त्यासोबतच अधिकाऱ्यांनीही स्वतःचे १० कोटी जोडून २०० कोटी प्रकल्पाची किंमत तब्बल ३१० कोटी केल्याचा आरोप अजित पवारांनी केला. दरम्यान त्यावेळी युती सरकारच्या काळात सिंचन खातं हे भाजपकडे होतं. दरम्यान १९९९ ला मी अर्थमंत्री होतो, त्या कालखंडात अशा स्वरूपाचा निर्णय झालेला मला आठवत नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली. तसंच २५ वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली§ असा सवाल एकनाथ खडसेंनी केला.अजित पवारांनी भाजपवर सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन गंभीर आरोप केला आहे. १९९ ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खाते आले. तेव्हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. मी पाहिली असता त्यामध्ये या योजनेची रक्कम ३१० कोटी रुपये असल्याचं आढळून आलं. मात्र मी अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारने वाढवल्याचे सांगितले. या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच असल्याच त्या अधिकाऱ्याने कबुल केलं. पुढे त्या अधिकाऱ्याने असं सांगितलं की, १०० कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागण्यात आले होते. मग आम्ही अधिकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आमचे १० कोटी वाढवले आणि प्रकल्पाची किंमत ३१० कोटी झाली. ती फाईल अजुनही माझ्याकडे आहे. ती जर काढली असती तर हाहाकार माजला असता, असा दावा अजित पवारांनी केला आहे.

