ठाणे : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा ठाण्यात सुरु आहे. या सभेत उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीतील पैसे वाटप, राज ठाकरेंसोबत झालेली युती आणि भाजपचे के अण्णामलाई यांच्या वक्तव्यावरुन हल्लाबोल केला. गेली 25 वर्षं ठाणेकरांनी ठाणे शिवसैनिकांकडे दिलं होतं, गद्दाराकडे दिलं नव्हतं, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाउद्धव ठाकरे यांनी निवडणूक सगळ्यांना घशाचा त्रास होतोय, असं म्हटलंय. राज ठाकरेंनी सांगितलेलं षडयंत्र हळू हळू आपल्या गळ्यापाशी आवळत आलंय, आपल्या सर्वांचा आवाज चेपण्याचा प्रयत्न चालू आहे. राज ठाकरे तुम्ही उमेदवार दाखवले, त्यांना 5 कोटी, एकाला 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती पण त्यांनी नकार दिला. आपण काय करणार हा प्रश्न आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कल्याणमध्ये घराघरात पैशाची पाकिटं जात आहेत, निवडणूक संपलीय नेमणुका सुरु झाल्या आहेत. आपण मतदान करतोय म्हणजे सरकार निवडतोय असं वाटत पण कदाचित शेवटची निवडणूक असेल. यापुढं देशाचे पंतप्रधान देश चालवतील असं वाटत नाही, राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील असं वाटत नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
आम्ही दोन भाऊ 20 वर्षांनी एकत्र आलो आहोत. आमची युती जागावाटपासाठी झालेली नाही. मराठी माणूस जागा करण्यासाठी युती झालेली आहे. आपण सर्वजण एक मातीची लेकरं आहोत. आमचा विरोध दुसऱ्या भाषेला विरोध नाही. आमच्या घरात घुसून दादागिरी करणाऱ्यांना उत्तर दिलं नाही तर शिवाजी महाराजांचं नाव कसं घ्यायचं. आम्ही सहनशील आहोत, सगळ्यांना आपलं मानत आलो. दादागिरी करणाऱ्यांना कानफाटा असं म्हटलं तर काय चुकलं, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.ज्या माणसानं शिवसेनेशी गद्दारी केली, तोच माणूस ठाण्याशी गद्दारी करतोय. हजार एकर जमीन त्यांनी देऊन टाकली. बाहेर पडल्यावर बावनकुळे म्हणतात ही जमीन माहिती नाही. मुख्यमंत्री असताना वनजमीन कोणत्या उद्योगपतीला दिली नव्हती. माझ्या काळात जेवढी जंगलं वाढवली तेवढं कोणीच केलं नसेलउद्या जर का काही झालं तर ठाण्यातील गद्दार निघून फाईव्ह स्टार शेतात हेलिकॉप्टर घेऊन निघून जातील. देवेंद्र फडणवीस जातील नागपूरला, तिसरे जातील काका मला वाचवा म्हणत बारामतीला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी म्हटलं. गेली 25 वर्षे मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेकडे दिलं, ठाणे शिवसेनेकडे दिलेलं, गद्दाराकडे दिलं नव्हतं. हा गद्दार निघेल तुम्हाला माहिती नव्हतं, मलाही माहिती नव्हतं. तुम्ही फसलात मी देखील फसलो, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
कोस्टल रोड आपण केलेला आहे, मुंबईकरांच्या पैशातून केला आहे, त्याचं श्रेय ते घेत आहेत. हिंदूह्रदयसम्राट आपला दवाखाना ही योजना आपली होती. सरकार पाडलं आणि फित कापली. फित कापली ती कापली ठाण्यात काय झालं, ठाण्यात आपला दवाखान्यात गद्दारांनी साड्यांचं दुकान काढलं. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आत गेलो तर साड्या, नेसवा त्या गद्दाराला आणि त्याची धिंड काढा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला

