भायखळा परिसरातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव मंडळ “भायखळ्याचा राजा” (रामनगर) यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त दिनांक ६ जून रोजी आयोजित सांकेतिक चिन्ह (logo) अनावरण सोहळ्यात उपस्थिती नोंदवण्यात आली. या समारंभाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते व भायखळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज पांडुरंग जामसुतकर व शिवसेना उपविभाग संघटिका व नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुतकर यांनी मानपूर्वक हजेरी लावली.
यावेळी आमदार जामसुतकर यांनी मंडळाच्या पुढील उपक्रमांसाठी मनोभावे शुभेच्छा दिल्या आणि गणरायाला प्रार्थना केली. ते म्हणाले की भायखळा येथील सार्वजनिक उत्सव आणि सांस्कृतिक परंपरा स्थानिक एकात्मता आणि सामाजिक समन्वयाची ओळख आहेत, तसेच स्थानिक युवक-युवतींना व्यस्त ठेवून सकारात्मक उपक्रमांना चालना देतात.
“भायखळ्याचा राजा” मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आराखडे, आगामी उत्सव नियोजन आणि समाजसेवी उपक्रमांची रूपरेषा उपस्थितांना मांडली. या कार्यक्रमाला उपाध्यक्ष चंद्रशेखर कानडे , अध्यक्ष शलाक घागरे, विवेक बाळासाहेब , संजय बेनके, खजिनदार कैलास लोखंडे ,नरेश मेहेर, जितेंद्र बेळे, पारस जाधव ,आर्यन कानडे, तन्मय मेहेर
स्थानिक नागरिक, मंडळ सदस्य व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

