गरीब मजुराला मारहाण करणाऱ्या काँग्रेस आमदारावर गुन्हा दाखल
गडचिरोली/मुरूम उत्खनन प्रकरणी एका मजुराला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून आरमोरी विधानसभेचे काँग्रेसचे आमदार रामदास मसराम यांच्यासह सहा जणांविरुद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल विकास राजगडे असे मजुराचे नाव असून तो गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, मारहाण केल्याचे वृत्त खोटे असल्याचे आमदार महोदयांनी म्हटले आहे.जिल्ह्यातील…
