फोर्टमधील मनीष मार्केट परिसरावर पालिकेचा हातोडा; ९२ अनधिकृत स्टॉल्सवर धडक कारवाई
मुंबई:दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या फोर्ट भागातील मनीष मार्केट, साबू सिद्धीक रोड आणि मुसाफिरखाना परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या ‘A’ वॉर्ड प्रशासनाने धडक अतिक्रमणविरोधी कारवाई केली. या मोहिमेत फूटपाथ व रस्त्यांवर बेकायदेशीरपणे थाटलेले तब्बल ९२ अनधिकृत स्टॉल्स आणि तात्पुरती शेड्स हटवून परिसरातील रस्ते मोकळे करण्यात आले.महापालिकेच्या ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ (पादचारी प्रथम) धोरणांतर्गत ही कारवाई करण्यात आली. मनीष मार्केट आणि…
