सदावर्तेच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न
जालना/जालन्यातील अंबड चौफुली येथे नियोजित अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या जागेवर दीपक बोऱ्हाडे यांनी धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करून जात प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुणरत्न सदावर्ते आज जालन्यात आले होते. दरम्यान, शहरातील एका पेट्रोल पंपासमोर गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. चार-पाच आंदोलकांनी गाडीच्या काचावर हाताने मारत…
