श्रीनगर/ जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. अनंतनागमध्ये माजी सरकारी डॉक्टर अदील अहमद रदर यांच्या लॉकरमधून एके-४७ जप्त करण्यात आली आहे. अदील २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत जीएमसी अनंतनागमध्ये कार्यरत होते. ते जलगुंड अनंतनागचे रहिवासी आहेत.
या प्रकरणी नौगाम पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एफआयआर नंबर १६२/२०२५ च्या अंतर्गत भारतीय बंदूक अधिनियमच्या विविध कलमांसह यूएपीएच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आणि तपास यंत्रणा या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करत आहेतअदील अहमद रदरच्या विरोधात शस्त्र बाळगणं आणि दहशतवादाशी संबंधित घडामोडींमध्ये सहभागी असल्याच्या संशयातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अदीलकडून हत्यार ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.डॉक्टरच्या लॉकरमधून एके- ४७ रायफल जप्त करणं सुरक्षा दलांसाठी मोठं यश आहे. शस्त्र कशाप्रकारे सुरक्षित ठिकाणी लपवली जाऊ शकतात, याचं उदाहरण यामुळे समोर आलं आहे. श्रीनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात डिजिटल आणि फिजिकल पुरावेदेखील गोळा केले जात आहेत.

