मुंबई/ स्थानिक काँग्रेस आमदार,लाचखोर पालिका अधिकारी आणि पोलिस यांच्या अभद्र युतीमुळे मालवणीच्या अनेक भागातील सरकारी भूखंडावर उभ्या राहिलेल्या घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंगी मुस्लिमांच्या झोपड्यांवर पालिकेने अखेर बुलडोझर फिरवला.मात्र ही कारवाई पुढे अशीच सुरू रहावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मुंबईतील मालाड मालवणी भागात स्थानिक मुस्लिम भूमाफियानी गेल्या काही वर्षांपासून इथले सरकारी भूखंड बळकावून त्यावर अनधिकृत झोपडपट्ट्या उभ्या केल्या होत्या.या झोपडपट्ट्या स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे संरक्षण असल्याने इथे रहात असलेल्या बांगलादेशी घुसखोर मुसलमान आणि रोहिंगे यांच्या इथे अनधिकृत वसाहती उभ्या राहिल्या होत्या.या वसाहतीमधून गांजा चरस हातभट्टीची दारू खुलेआम विकली जात असे.तसेच इतरही अनेक प्रकारच्या देशविघातक अँक्टिव्हिटीज चालत असल्याची माहिती पुढे येत होती.तसेच याबाबत पालिकेकडे तक्रारी करण्यात येऊनही कारवाई केली जात नव्हती.अखेर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सदर प्रकरणात लक्ष घालून कारवाईसाठी पाठपुरावा केला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना ही संपूर्ण प्रकरण सांगितले त्यानंतर फडणवीस यांनी प्रशासनातील संबंधित विभागाचे अधिकारी ,पोलिस आणि पालिका अधिकारी आदींची एक बैठक घेऊन त्यांना या अनधिकृत झोपड्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले त्यामुळे आता प्रचंड पोलिस बंदोबस्त पालिकेने या बेकायदेशीर झोपड्यांवर बुलडोझर फिरवायला सुरुवात केली आहे.मात्र ही कारवाई मधेच न थांबता या संपूर्ण वसाहती नेस्तनाबूत करूनच थांबवावी अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे..

