पाटणा/बिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यातील १२१ जागांवर मतदान ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. बिहारमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात मतदान वाढलं आहे. जन सुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी वाढलेलं मतदान लक्षात घेता मोठा दावा केला आहे. प्रशांत किशोर यांच्या दाव्यानुसार गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी झालेलं अधिक मतदान हे दाखवतं की जनतेला बदल हवा आहे. नवी व्यवस्था येत आहे.
बिहारमध्ये गेल्या निवडणुकीवेळी पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर ५८.८१ टक्के मतदान झालं होतं. यावेळी सायंकाळी ५ वाजता मतदानाची आकडेवारी ६०.१३ टक्क्यांवर पोहोचली आहे. तर, नव्या माहितीनुसार बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात ६४.४६ टक्के मतदान झालं आहे. मात्र काही ठिकाणी झालेल्या हिंसक घटनांमुळे मतदानाला गालबोट लागले. मतदानासाठी महिलांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं. प्रशांत किशोर यांचा पक्ष यावेळी पूर्ण ताकदीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यांच्या पक्षाला किती जागांवर विजय मिळतो ते पाहावे लागेल.दुसरीकडे महागठबंधनच्या नेत्यांनी या वाढलेल्या मतदानासंदर्भात वेगवेगळे दावे केले आहेत. भाकप (मार्क्सवादी) चे महासचिव एमए बेबी यांनी गुरुवारी म्हटलं की महागठबंधनच्या प्रचाराला बिहारच्या लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे. तरुण नफरत आणि द्वेषाच्या राजकारणाला स्वीकारणार नाहीत, असं ते म्हणाले. सीपीआयचे महासचिव एमए बेबी यांनी म्हटलं की महागठबंधननं लोकांच्या कल्याणाचे, उपजिविकेचे मुद्दे मांडले आहेत. बेबी म्हणाले की, महागठबंधनच्या प्रचाराला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही लोकांच्या कल्याण आणि उपजिविकेच्या मुद्यांना समोर आणण्यात यशस्वी ठरलो आहेत, असंही ते म्हणाले.

