मुंबई/ मध्य मुंबईतील मराठी माणसाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या डिलाईरोड सारख्या गिरण गावातील लोकांना पाण्यासाठी झगडावे लागते आहे ही अत्यंत शरमेची बाब आहे असे मनसेचे वार्ड क्रमांक 199 चे शाखा अध्यक्ष मारुती दळवी यांनी म्हटले आहे .याबाबत दळवी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून डिलाईरोडच्या ना म जोशी मार्गावरील गोवर्धन बिल्डिंग आणि आसपासच्या ईमारती भागात पाणी येत नाही या बाबत पालिकेकडे विचारणा केली असता पालिका अधिकारी तांत्रिक बिघाड झाला आहे असे सांगतात तांत्रिक बिघाड हा काय फक्त एकच ठिकाणी होतो का? या भागातून अनेक नामचीन लोकप्रतिनिधी निवडून गेले त्यात स्नेहल आंबेकर, किशोरी पेडणेकर असे तीन महापौर याच भागातले तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा हा मतदार संघ असे असताना इथल्या लोकांना जर पाणी मिळत नसेल तर काय फायदा बरे या वर्षी अफाट पाऊस पडतोय. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव ओव्हरफ्लो झालेत तरी डिलाईरोडच्या जनतेला पाणी नसल्याने धरण उशाला आणि कोरड घशाला अशी इथल्या लोकांची अवस्था झाली आहे
Similar Posts
मुंबईत जन्माला आल्याशिवाय मुंबईचे प्रश्न कळणार नाहीत – राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबई/: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासकट बहुतांश राज्यकर्ते हे मुंबईतील नाहीत, ते मुंबईच्या बाहेरचे आहेत. त्यामुळे त्यांना मुंबईकरांचे प्रश्न त्यांना कळू शकत नाहीत, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना राज ठाकरे यांनी मुंबईकरांना विचार करायला लावणारा हा मुद्दा उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचे डेथ वॉरंट काढण्यात आले…
पुण्यातील पब वर बुलडोजर फिरवले आता मुंबईतले बेकायदेशीर पब कधी तोडणार मुंबईकरांचा सवाल
मुंबई/पुण्यात वेदांत अग्रवाल या लक्ष्मी पुत्राने दारूच्या नशेत ताशी 200 किलोमीटर वेगाने गाडी चालवून एका तरुण तरुणीचा जीव घेतला त्यानंतर सरकार आणि महापालिकेलाही जाग आली आहे पुणे महापालिकेने पुण्यातील बेकायदेशीर पब आणि बारवर बुलडोझर फिरवायला सुरुवात केली आहे काल जवळपास सात ते आठ बार वर बुलडोजर फिरवण्यात आला ज्याप्रमाणे पुण्यात पॉप संस्कृती जोर गरज होती…
डेक्कन एडुकेशन सोसायटी (डीईएस) मुंबई कॅम्पस व एनआयपीएम मुंबई चॅप्टर त्याच्या संयुक्त विद्यमाने- शिखर सम्मेलन- शनिवार, ९ ऑक्टोबर २०२१ रोजी, सकाळी १०. ३० वाजता.
चौथ्या औद्योगिक क्रांतीचे (4 IR) चे वर्णन बऱ्याचदा येऊ घातलेलं वादळ असं केलं जातं. प्रचंड वेगाने येणाऱ्या ह्या क्रांतीने होऊ घातलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी. एचआर शिखर परिषदेतील एकदिवसीय पॉवरपॅक सत्र. एच आर प्रोफेशन साठी एक अद्ववतीय संधी असेल. विचार करायला प्रवत्तृ करणारे विषय, दोन पॅनलमधील विचारांची देवाण घेवाण ,एच आर सोबत नेटवर्क या कॅम्पस इव्हेंटमधील…
बिहार निवडणुकीत माविआ मधील जागावाटपाचा तिढा कायम – काँग्रेसला जास्त जागा सोडण्यास लालूंचा नकार
बिहार विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. मात्र, अद्याप महाआघाडीतील जागावाटपाचा तिढा काय असल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस मध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लालू यादव काँग्रेसला ५० हून अधिक जागा देण्यास तयार नाहीत. तसेच, काँग्रेसही काही…
लाडकी बहीण योजनेला ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मात्र या योजनेसाठी अर्ज भरण्याची अखेरची तारीख ३१ ऑगस्ट होती त्यामुळे ज्या महिलांना अर्ज करत आला नाही त्या नाराज होत्या व अर्ज भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी करीत होत्या त्यानुसार आता ला डकी बहीण योजनेला ३० सप्टेंबर पर्यंत म्हणजे १ महिन्याची मुदतवाढ देण्यात…
आयजीच्या जीवावर बायजी उदार
लाडकी बहीण योजना ही कोणत्याही दृष्टिकोनातून महाराष्ट्राला परवडणारी नव्हती. पण केवळ महिलांच्या मतांवर डोळा ठेवून ही योजना राबवली जात आहे. पण ही योजना राबवताना श्रेय वादाचे जे घाणेरडे राजकारण सुरू झालेले आहे, ते अत्यंत कीळसवाने आहे. महायुती मधील राष्ट्रवादीचा अजित पवार गट ,शिवसेनेचा शिंदे गट ,आणि भाजपा यांच्यात लाडक्या बहिणी योजनेचे श्रेय घेण्यावरून अक्षरशा लढाई…
