मुंबई दिं-19 सप्टेबर- गेल्या काही वर्षांपासून मुंबई मधील डान्स बार बंद आहेत दिवंगत आर आर पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी कायदा करून डान्स बार मधील नाच बंद केले. मात्र स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने मुंबई सह राज्यातील अनेक शहरांमध्ये डान्स बार सुरू आहेत. मुंबईतील ताडदेव ‘ इडियाना रेस्टॉरंट बार ‘ नावाचा बार असून त्यात बेकायदेशीरपणे अश्लील डान्स सुरू असतो. त्यामुळे या बार मध्ये तुफान गर्दी असते या गर्दीत काही चोर, दखलेबाज गुंड,बिल्डर यांच्यासारखे लोक मोठ्या प्रमाणात येत असतात अशी माहिती तिथल्या काही ग्राहकांनीच उघड केली आहे. त्यामुळे या बारवर तत्काळ कारवाई करावी आणि त्याचा परवाना रद्द करावा कारण या बारमुळे या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका होऊ शकतो असे इथल्या जनतेचे म्हणणे आहे. हा बार ताडदेव पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याने ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करतात काय? असा सवाल इथल्या जनतेने केली आहे.
Similar Posts
पालिका निवडणुकीच्या तोंडावर सेना -भाजपा मध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू-१०० कोटींचा घोटाळा
मुंबई/ पालिका निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे सेना भाजपतील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.एकीकडे भाजपकडून किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून सेनेवर नव्या नव्या घोटाळ्यांचे आरोप होत आहेत तर सेनाही भाजपा वर आरोपांच्या फैरी झडत आहेत खास करून सेनेचे पालिकेतील घोटाळे उघडकीस आणीत आहे .आता चर बुजवण्याचे निविदा प्रकरणात १०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप…
राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे
मुंबई/ पी जी ,नीट च्या मुद्द्यावरून गेल्या २७ तारखेपासून महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी संप सुरू केला होता त्याला डॉक्टरांची अधिकृत संघटना असलेल्या मार्ड ने पाठींबा देऊन सोमवारपासून मार्डचे डॉकटर ही या संपात उतरले होते मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून पी जी नीट बाबत केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल तसेच पिजी नीट कोनसलीग…
गणेशविसर्जनासाठी बनवलेल्या कृत्रिम तलावात – कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांनी हात धुवून घेतले
.मुंबई – २०२० नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्त्यांवर निर्बंध लादले. पीओपीच्या गणेश मूर्ती बनवणे, विकणे व वाहतूक करणे यावर बंदी घालण्यात आली. जेणेकरून जलप्रदूषण होऊ नये. तसेच प्लास्टिक आणि थर्माकोलवरही बंदी घालण्यात आली. त्याऐवजी चिकणमातीच्या मूर्ती बनवाव्यात असे आदेश देण्यात आले. पॉप लवकर विरघळत नाही त्या ऐवजी चिकन माती…
फोन टॅपिंग प्रकरणातील रश्मी शुक्ला – महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक
मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळं त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणामुळं त्या चर्चेत आल्या होत्या, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोनकॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या फोन…
शिंदे गटाची पहिली यादी जाहीर सात माजी खासदारांना पुन्हा उमेदवारी
मुंबई/महायुतीतील शिंदे गटाची आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे या यादीमध्ये सात विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलेले आहे तर नाशिक ठाणे संभाजीनगर कल्याण डोंबिवली या मतदार संघांमधील उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीराष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे बुलढाण्यातून प्रतापराव जाधव हिंगोलीतून महेश पाटील कोल्हापूर मधून सदाशिव मंडलिक आज कंगले मधून धैर्यशील…
