मुंबई / रविवारी झालेल्या 608 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत भाजप वरच्या श्रधेपोटी भक्तांनी भाजपच्या पदरात भरभरून मते टाकली आणि या निवडणुकीत भाजपने बाजी मारली.तर या निवडणुकीत शिवसेनेला फुटीचा फटका बसून शिवसेना पाचव्या क्रमांकावर फेकली गेली दरम्यान हा निकाल म्हणजे भविष्यातील नांदी आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
रविवारी झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत जवळपास 80 टक्के मतदान झाले होते त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिला याबद्दल सर्वानाच मोठी उत्सुकता होती .मात्र हा निकाल भाजपच्या बाजूने लागला भाजपा आघाडीने 228 जागा जिंकल्या आहेत त्यात एकट्या भाजपने 188 जागा जिंकल्या तर दुसरा क्रमांक राष्ट्रवादीचा आहे राष्ट्रवादीने 136 जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसला 59 आणि शिंदे गटाला 40 जागा मिळाल्या शिवसेनेला केवळ 37 जागांवर समाधान मानावे लागले तर इतर छोट्या पक्षांनी 108 जागा जिंकल्या भाजपने जरी पहिला क्रमांक पटकावला असला तर गिरीश महाजन यांच्या उत्तर महाराष्ट्रात धुव्वा उडाला हा निकाल म्हणजे शिवसेना आणि काँग्रेससाठी आत्मचिंतन करायला लावणारा निकाल आहे ग्रामीण भागातील जनता भाजप वर अंधविश्वास टाकून जर असेच भाजपला मतदान करणार असेल तर भविष्यात त्यांचे काही खरे नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
बॉक्स ग्रामपंचायत निकाल
एकूण जागा 608
जाहिर निकाल 594
भाजप 188
राष्ट्रवादी 136
काँग्रेस 85
शिंदे गट 40
शिवसेना 37
इतर. 108
