भाजपा प्रणित एन डी ए आघाडीच्या विरोधात आता आणखी एक नवी आघाडी तयार होत आहे आणि ही आघाडी नितीश कुमार यांच्या नेतृत्वखालील भाजपला पर्याय देण्यासाठी तयार केली जात आहे . या आघाडीत अर्थातच फुटीर नेत्यांचा गोतावळा आहे हे वेगळे सांगायची गरज नाही नितीश कुमार यांचा इतिहास संपूर्ण देशाला ठाऊक आहेत बिहारच्या राजकारणात त्यांना पलटूराम चाचा म्हणतात ते कधी कुठे आणि कशी पलटी मरतील याचा नेम नाही . स्वतःला समाजवादी म्हणवून घेणाऱ्या नितीशकुमार यांनी आतापर्यंत बऱ्याच वेळा आघाड्या बदलून आपला फायदा करून घेतला समाजवादी असूनही मोदींच्या नादी लागून सुरुवातीला एन डी ए आघाडीत गेले त्यानंतर भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले .पण मोदीबरोबर मतभेद होताच त्यांनी लालूंचा कंदील हाती घेतला पण या कंदिलाच्या उजेडात त्यांना लालू आणि त्यांच्या पराटोरांचा भ्रष्टाचार दिसताच लालूंची साथ सोडून पुन्हा भाजपच्या तंबूत शिरले आणि बिहार मध्ये भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले पुढे भाजप सोबत विधानसभेची निवडणूक लढवून सतेवर आले पण भाजपच्या जास्त जागा आल्या तरीही भाजपने अगोदर ठरल्या प्रमाणे नितीश कुमारनं मुख्यमंत्री पद दिले .पण भाजपने जेंव्हा आपले खरे रूप त्यांना दाखवून त्यांचे आमदार फोडायला सुरुवात केली तेंव्हा आता आपले काही खरे नाही याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी पुन्हा लालूंची मदत घेऊन बिहार मध्ये लालूंच्या मदतीने सत्ता स्थापन केली . पण आता त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडू लागली त्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावरचे नेतृत्व करायचे आहे त्यामुळे आपल्या सारख्याच फुटिरांच्या शोधात ते दिल्लीत फिरत आहेत काय तर म्हणे भाजपच्या विरोधकांना एकत्र आणून मोदींना सतेतून हटवायचे आहे.नितीश कुमार यांचे हे प्रयत्न कधी यशस्वी होतील असे वाटत नाही
लोकांना बदल हवंय पण ज्यांच्या हाती सत्ता जाईल त्यांची विश्वसनीयता सुधा तितकीच महत्वाची आहे पण विरोधकांची विश्वसनीयता हा संशोधनाचा विषय आहे त्यामुळे बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे व्हायला नको याची लोकांना भीती आहे . दिल्लीत नुकतीच नितीश कुमार आणि शरद पवार यांची भेट झाली या भेटीत अर्थातच सर्व विरोधकांना एकत्र आणण्यावर चर्चा झाली असणार . पण आज विरोधकांची दहा दिशेला दहा तोंडे आहेत काँगसची सध्या प्रादेशिक पक्ष्या पेक्षा वाईट अवस्था आहे . त्यामुळे ममता आणि समाजवादी पक्षाचे लोक काँग्रेसच्या सावलीला सुधा उभे राहायला तयार नाही . केजरीवाल यांनीही काँग्रेसची एलर्जी आहे पण काँग्रेस स्वातंत्र्य संग्रामातील नायक आहे त्यामुळे काँग्रेसला डावलून चालणार नाही . काँग्रेसलाच नव्हे तर भाजपच्या विरोधात असलेल्या कुणालाही डावलून चालणार नाही तरच भाजपच्या विरोधात एक व्यापक जनआंदोलन उभे राहू शकेल आणि सध्या तरी अरविंद केजरीवाल आणि टी आर एस चे चंद्रशेखर राव हेच विरोधी पक्षाचे विश्वासू चेहरे आहे . त्यामुळे या दोघांचे नेतृत्व विरोधी पक्षाला निश्चितपणे तारू शकते.नितीश कुमार आणि शरद पवार यांच्यावर देशातील शेंबड्या पोराचाही विश्वास नाही त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाच्या एकजुटीनी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये .
