आज भारताचा प्रजासत्ताक दिन ! दरवर्षी प्रमाणे केवळ एक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली तरी जात पात धर्म कर्मकांड यातून काही मुक्ती मिळालेली नाही आजही या देशात अन्न ,वस्त्र ,निवारा, पाणी ,वीज रस्ते यासारख्या मूलभूत गरजांसाठी लोकांना आंदोलने करावी लागतात.विकास फक्त कागदावर दिसतो .लोकसंख्या वाढतेय आणि वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीने समस्या सुधा वाढत आहेत.आणि याची अनेक कारणे आहेत त्यातले पाहिले कारण म्हणजे लोकांच्या मेहनतीचा पैसा देव, धर्म, पुतळे, स्मारके यासारख्या अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जातोय आणि जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांसाठी कर्ज काढले जातेय आणि ही परिस्थिती असताना पंतप्रधान देशाला आर्थिक महासत्ता बनवायला निघालेत .वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी २०० दिवस आम्ही सुट्ट्या घेऊन काम धंदे बंद ठेवतोय त्यामुळे देशाचे उत्पादन आणि सरकारचा महसूल बुडतो आहे असे असताना देश कसा महासत्ता बनणार याचे उत्तर पंतप्रधान मोदींकडे नाही ..वास्तविक या देशात सर्व काही आहे विपुल खनिज संपत्ती आहे मोठ्या प्रमाणात अन्न धान्याचे उत्पादन होतेय प्रचंड असे मनुष्यबळ आहे बऱ्यापैकी उद्योगधंदे आहेत पण या सर्वातून मिळणाऱ्या पैशाचा योग्य वापर होत नाही. एक लाख कोटी धर्म ,स्मारके,आणि इतर अनावश्यक गोष्टींसाठी अब्जावधी रुपयांची उधळपट्टी पण यातून काय मिळणार आहे ? हाच पैसा जर उद्योग धंद्यासाठी वापरला असता तर लाखो बेरोजगारांना रोजगार मिळाला असता या पैशातून शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या असत्या तर त्याचा 18 मुलांना उच्च शिक्षित होण्यासाठी लाभ मिळाला असता याच पैशातून जर देशाच्या वेगवेगळ्या भागात अत्याधुनिक रुग्णालये उभी राहिली असती तर त्याचा जनतेच्या आरोग्याला फायदा झाला असता पुतले,स्मारके आणि बुलेट ट्रेन सारख्या अनवाह्या गोष्टींचा लोकांना काय फायदा ? सरकार मध्ये के कुणी बसले आहेत त्यांच्या जुनाट धार्मिक मानसिकतेत कधी परिवर्तन होणार आहे कुणास ठाऊक? जोवर आम्ही शाश्वत गोष्टींमध्ये विश्वास मानून त्यात परिवर्तनाचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणार नाही तोवर या देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होणार नाही आणि तसे झाले तरच आपल्याला सारे जहसे अच्छा हिंदुस्तान हमारा असे म्हणण्याचा अधिकार असेल
Similar Posts
ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना यंदा पंधरा हजार सानुग्रह अनुदान तर कंत्राटी कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस
मुंबई/ दिवाळी तोंडावर आलेली असतानाच ठाणे महानगर पालिकेतील ८२७८ कायम स्वरुपी कर्मचाऱ्यांना यंदा साडे पंधरा हजर रुपये सानुग्रह अनुदान तर कंत्राटी कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे त्यामुळे ठाणे महापालिकेतील कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांची सुधा दिवाळी गोड होणार आहेदरम्यान या खर्चामुळे ठाणे महानगर पालिकेवर १२ कोटी ८३ लाखांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे…
सोमवारी संजय राऊत उद्धव ठाकरे नागपुरात – मोठा गौप्य्स्फोट करण्याची शक्यता
मुंबई – हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विवधक यांच्यात आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांची पोलखोल करण्याची स्पर्धा लागली आहे. एकीकडे आदित्य ठाकरेंवर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आरोप सुरु आहेत तर दुसरीकर राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप झालाय या दोन्ही प्रकरणांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले असतानाच . सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सोमवारी नागपूरला येणार…
पेपर फुटीचा घोटाळेबाज सुपे निलंबित
मुंबई/ शिक्षक भरती परीक्षेसह म्हाडाच्या नोकर भरती परीक्षेचे पेपर फोडून मालामाल झालेला शिक्षण परिषदेचा घोटाळेबाज आयुक्त तुकाराम सुपे याला अखेर शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी निलंबित केले आहेसुपे यांनी पेपर फुटीचे मोठे रॅकेट चालवून करोडो रुपये कमावले त्याचा पेपर फोडणाऱ्या १४ टोळ्या बरोबर संबंध होता त्याच्या अटकेनंतर त्याच्या घरावर टाकलेल्या पहिल्या धाडीत ८८ लाख आणि सोने…
भारतातील पाकिस्तान्यांची हकालपट्टी सुरू – ४८तासात देश सोडण्याचे आदेश
मुंबई/पहेलगाम मध्ये निरापुरात पर्यटकांवर गोळीबार करून २७ जणांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी आणि पाकिस्तान विरुद्ध भारत सरकारने आक्रमक भूमिका घेत, भारतात आलेल्या पाकिस्तानी विजा रद्द करण्याचा निर्णय घेतला .तसेच त्यांना ४८तासात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातूनही पाकिस्तानी नागरिकांची हकलपट्टी सुरू झाली आहे. त्यासाठी पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे .दरम्यान पाकिस्तानी अभिनेते किंवा खेळाडू…
महायुतीला मनसेचे इंजिन
सत्तेच्या राजकारणात नैतिकता, विचारधारा, धोरण याना काहीही किंमत नसते. त्यामुळे कोण कोणाचा कायमचा मित्र, अथवा कायमचा शत्रू नसतो .कारण सत्तेच राजकारण हे बेरजेचं असतं. त्यामुळे कधी कधी आपली ध्येय धोरणे बाजूला ठेवून, युत्या आघाड्या कराव्या लागतात. सध्या महायुती असो ,किंवा महाविकास आघाडी, या दोन्हींमध्ये वेगवेगळ्या विचारधारांचे लोक एकत्र आलेले आहेत .आणि ही त्यांची मजबुरी आहे….
राजकीय पक्षांनी संपर्काचा तपशील त्वरित राज्य निवडणूक आयोगास पाठवावा
मुंबई, दि. 24 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्याप्रमाणावरील आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा तपशील आयोगाकडे दिला नसल्यास तो तातडीने सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे.राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या 305 राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. त्या सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा पत्ता,…
